Thursday, May 16, 2019

" तुझ्याच साठी "

तुझ्याच साठी सखे
असते माझी कविता ।
मनात भाव कितीक
करतो घडा रिता ।

पदो पदी क्षणो क्षणी
तू असतेस माझ्या मनात ।
शब्द होऊन अवतरतेस
झुलते मन क्षणात ।

शब्दांच्याही पलीकडे
लपल्या आहेत व्यथा ।
सांगू कसे तुला मी
अंता वीणा ती कथा ।

थांबवू नको तू हसणे
नको वाटे तुझे रुसणे ।
जीवन ही एक गाथा
हवे त्यात तुझे असणे ।
Sanjay R.

" अरमान "

ना भुले है कुछ
ना भुलेंगे कुछ  ।
है अरमान वही
दिलसे तो पुछ ।

बाते है वही
जो दिलने कही ।
आज भी है
दिलमे सही  ।

यादे अब वही
न भुलना कभी ।
दिल ही दिलका
है साथी अभी ।
Sanjay R.

" कसारे पावसा "

कशाला ऐकतो रे हा पाऊस
बुडवायची तर त्यालाच हाऊस ।

आलाच तर येणार खूप
पाणी पाणी होणार पाऊस ।

नाहीतर कोरडे आभाळ सारे
घोर जीवाला नको रे लाऊस ।

पाण्याविना जीवन नाही
गीत पावसाचे नको गाऊस ।

जंगल झाडे लयास गेले
हिसका तुझा रे नको दाऊस ।

थोडा थोडा रोज तू पड
सोडून आम्हा नको तू जाऊस ।
Sanjay R.

Wednesday, May 15, 2019

" मुंबई शहर लय भारी "

मुंबई ची लोकल लय भारी
आत घुसण नशिबाची दोरी ।

पायदळ करा कितीही वारी
लोकल मधेच मज्जा न्यारी ।

चढा उतरा ती कसरत खरी
जमत नसेल तर बसा घरी ।

वेळेला पण  किंमत भारी
धावपळ असते जन्मभर सारी ।

मुंबई शहर हो लईच भारी
नाशीबावरच असते दोरी ।

म्हातारे कोतारे असाल जरी
मरायसाठीच जगतात सारी ।
Sanjay R.

Tuesday, May 14, 2019

" इंतजार "

कल उनको था इंतजार
आज हमको ।
रुठ गये है वो आज हमसे
पुछे अब किनको ।
तरस गये मानानेको आज
कह दो अब उनको ।
सामने जब आये वो हमारे
कहेंगे दिलसे दिलको ।
Sanjay R.