Thursday, May 16, 2019

" कसारे पावसा "

कशाला ऐकतो रे हा पाऊस
बुडवायची तर त्यालाच हाऊस ।

आलाच तर येणार खूप
पाणी पाणी होणार पाऊस ।

नाहीतर कोरडे आभाळ सारे
घोर जीवाला नको रे लाऊस ।

पाण्याविना जीवन नाही
गीत पावसाचे नको गाऊस ।

जंगल झाडे लयास गेले
हिसका तुझा रे नको दाऊस ।

थोडा थोडा रोज तू पड
सोडून आम्हा नको तू जाऊस ।
Sanjay R.

Wednesday, May 15, 2019

" मुंबई शहर लय भारी "

मुंबई ची लोकल लय भारी
आत घुसण नशिबाची दोरी ।

पायदळ करा कितीही वारी
लोकल मधेच मज्जा न्यारी ।

चढा उतरा ती कसरत खरी
जमत नसेल तर बसा घरी ।

वेळेला पण  किंमत भारी
धावपळ असते जन्मभर सारी ।

मुंबई शहर हो लईच भारी
नाशीबावरच असते दोरी ।

म्हातारे कोतारे असाल जरी
मरायसाठीच जगतात सारी ।
Sanjay R.

Tuesday, May 14, 2019

" इंतजार "

कल उनको था इंतजार
आज हमको ।
रुठ गये है वो आज हमसे
पुछे अब किनको ।
तरस गये मानानेको आज
कह दो अब उनको ।
सामने जब आये वो हमारे
कहेंगे दिलसे दिलको ।
Sanjay R.

" आई "

सत्यातली दुनिया
त्यात अतूट प्रेमाच्या माळा ।
आई जोजवते लेकराला
निज निज रे माझ्या बाळा ।
Sanjay

Sunday, May 12, 2019

" किनारा "

बेधुंद हा वारा
खळखळतो  किनारा
सखे संगे तुझ्या मी
कळला का तुज इशारा

आठवण तुझी मज
करते अशी बेधुंद ।
मनाचा ग माझ्या
सोड ना तू बंध ।

दुरून या येतात
सागराच्या लाटा ।
चल ना सखे जाऊ
नेतील जिथे वाटा ।

दूरवर दिसतो
स्वप्नांचा एक आडोसा ।
जगू स्वप्न तिथेच
मिळेल मनास दिलासा ।
Sanjay R.