सत्यातली दुनिया
त्यात अतूट प्रेमाच्या माळा ।
आई जोजवते लेकराला
निज निज रे माझ्या बाळा ।
Sanjay
Tuesday, May 14, 2019
" आई "
Sunday, May 12, 2019
" किनारा "
बेधुंद हा वारा
खळखळतो किनारा
सखे संगे तुझ्या मी
कळला का तुज इशारा
आठवण तुझी मज
करते अशी बेधुंद ।
मनाचा ग माझ्या
सोड ना तू बंध ।
दुरून या येतात
सागराच्या लाटा ।
चल ना सखे जाऊ
नेतील जिथे वाटा ।
दूरवर दिसतो
स्वप्नांचा एक आडोसा ।
जगू स्वप्न तिथेच
मिळेल मनास दिलासा ।
Sanjay R.
Saturday, May 11, 2019
" घे बाबू ईळा "
भारी लय झाला हो
अमदाचा ह्या उन्हाळा ।
येईन आता डौलन
ऋतू पावसाळा ।
शेतकरी शोधन मंग
आकाशात ढग काळा ।
तयार हाये जमीन
आता बियानाचा घोळा ।
पैसा अडका सरला
शोधा सावकाराचा खळा ।
पीक न्हाई झालं तं मंग
झाडाले लटकवाचा गळा ।
चाल बाबू कहाड आता
सरण तोडले इळा ।
Sanjay R.
" मोठ्ठा घोय "
दिस हाये उन्हायाचे
पाहून बापू जेव ।
नाईतन मग तुले
दिशीन सारे देव ।
घोयंच्या भाजीनं
केला मोठ्ठा घोय ।
सकाय झाली बेकार
अंदर कोन होय ।
लय झाले गा येले
गेला सगळा चेव ।
डाकटरनं बी लुटलं
वाटते आता भेव ।
Sanjay R.
" सूर '
तू तिथे दू...र
मी इथे आतुर ।
छेड ना बासरी
दे मजला सूर ।
अंतरातलं माझ्या
संपू दे काहूर ।
Sanjay R.