दिस हाये उन्हायाचे
पाहून बापू जेव ।
नाईतन मग तुले
दिशीन सारे देव ।
घोयंच्या भाजीनं
केला मोठ्ठा घोय ।
सकाय झाली बेकार
अंदर कोन होय ।
लय झाले गा येले
गेला सगळा चेव ।
डाकटरनं बी लुटलं
वाटते आता भेव ।
Sanjay R.
दिस हाये उन्हायाचे
पाहून बापू जेव ।
नाईतन मग तुले
दिशीन सारे देव ।
घोयंच्या भाजीनं
केला मोठ्ठा घोय ।
सकाय झाली बेकार
अंदर कोन होय ।
लय झाले गा येले
गेला सगळा चेव ।
डाकटरनं बी लुटलं
वाटते आता भेव ।
Sanjay R.
तू तिथे दू...र
मी इथे आतुर ।
छेड ना बासरी
दे मजला सूर ।
अंतरातलं माझ्या
संपू दे काहूर ।
Sanjay R.
तुझ्या भेटी साठी
मीही आहे आतुर ।
सांग ना वेळेला थोडं
होऊ नको म्हणा फितूर ।
मन थोडं हळवं माझं
भटकत असतं दूर दूर ।
तुझीच त्यास प्रतीक्षा
लावतं मलाच हूर हूर ।
कधी उठे पेटून मग
होई काळा काळा धूर ।
ठेच लागता छोटीशी
डोळ्यातून वाहे पूर ।
चाहूल तुझी मग लागता
गावसतो त्यासी सूर ।
विसावते तुझ्यात मग
सांग काय माझा कसूर ।
Sanjay R.
गोड तुझं हसणं
हळूच थोडं लाजण ।
मनाचा माझ्या ग
ठाव घेते तुझं बघणं ।
हवं हवसं वाटत मला
जवळ तुझं असणं ।
हुरहूर लावते मनाला
तुझं सोबत नसणं ।
Sanjay R.