Wednesday, April 3, 2019

" द्रोह "

हार गुलाबाचे टाकून
करू आम्ही स्वागत ।
देशद्रोह करा तुम्ही
पाजू देशभक्तीचे रगत ।
कायदाच नसेल आता
बसा सगळेच बघत ।
Sanjay R.

Tuesday, April 2, 2019

" भोळी चारोळी "

चार ओळींची चारोळी
दिसते थोडी भोळी ।
पण आहे शब्दांचे जाळे
लावून बसलेला कोळी ।
जरा बघा तिचे इशारे
पडेल अपुरी ती झोळी ।
भावनांचा वाचे पाढा
मनाची करते खेळी ।
Sanjay R.

Sunday, March 31, 2019

" मागणं "

जीवन हेच
एक रडगाणं ।
नको वाटे ते
रडकं जिणं ।
थोडं हसणं
थोडं रुसणं ।
सहजच सरेल
हसत जगणं ।
देवापाशी माझं
काय मागण !
बदलून टाक
साऱ्यांचं वागणं ।
Sanjay R.

Friday, March 29, 2019

" पिवशी "

" पिवशी "

चाल ना मावशी
घे तुयी पिवशी ।
जाऊ आता जत्रेले
लय तिथं हाउशी ।
काय काय घ्याचं
गंज आन पावशी ।
सेनीमा बी रायते
जत्रच्या दिवशी ।
चाल ना लवकर
घे तुयी पिवशी ।
मिरवून घेजो
जशी हौशी नौशी ।
Sanjay R.

" उगवला सूर्य "

उगवला सूर्य
प्रभात झाली ।
प्रकाशली धरती
बहुरंगात न्हाली ।

प्रखरता सूर्याची
दिसे तुझ्या भाली ।
फुलला आनंद
झळकला गाली ।

चिवचिव पाखरांची
मधुर झाले गाणे ।
ओठात तुझिया भासे
सुरेल ते ताराणे ।

बघून थाट धरेचा
तारे दिपून गेले ।
नेत्रात बघून तुझ्याच
मन फुलून गेले ।
Sanjay R.