नाही हा दहशतवाद
हे तर आहे आक्रमण ।
भ्याडांनी केला हल्ला
यात कुठला पराक्रम ।
घरात घुसून मारा आता
वाट कुठवर बघणार आपण ।
Sanjay R.
Friday, February 15, 2019
" श्रद्धांजली "
Wednesday, February 13, 2019
सहजच
घालावू कसा
सांग राग तुझा ।
मैत्रीचा हा धागा
बांध ना माझा ।
Sanjay R.
बघू दे मला गालावर
हास्याची एक छटा ।
वाटत सतत तू हसावं
जशा सागराच्या लाटा ।
चल जाऊ या दूर तिथे
जिथे हास्यनगरीच्या वाटा ।
Sanjay R.
हात लिया जब
हमने दोस्तीका ।
बस मूड होता है
उनसे मस्तिका ।
Sanjay R.
" धडधडते छाती "
विश तुझी ही
कशी छान किती ।
करू मी मिस
तुला सांग किती ।
घागर अजूनही
आहे ग रीती ।
डोळयांत बघ
दिसेल माझी प्रीती ।
नाही ठाव मज
काय जगाची रीती ।
साचली डोळयांत
बघ आसवं किती ।
गळ्यात हुंदका,
आणी धडधडते छाती ।
Sanjay R.
Monday, February 11, 2019
" टेडी डे स्पेशल "
" टेडी डे स्पेशल "
नको मला टेडी
होईल मी वेडी ।
हवी मला साडी
राहायला माडी ।
आणि सदा तुझी
लाडी गोडी ।
Sanjay R.
Saturday, February 9, 2019
" प्रपोज "
कसं करायचं असतं प्रपोज
असाच तर असतो दिवस रोज ।
वेळ आणी तारीखेची
चालते नुसती मोजमोज ।
निघून जातं आयुष्य
राहून जातो प्रपोज ।
परत येतो दिवस तसाच
वेगळं नसतंच रोज रोज ।
जाऊ द्या विसरा सारं
करतो आज स्वतःलाच
प्रपोज प्रपोज प्रपोज ।
Sanjay R.
🌷🌹🌷