Monday, February 11, 2019

" टेडी डे स्पेशल "

" टेडी डे स्पेशल "

नको मला टेडी
होईल मी वेडी ।
हवी मला साडी
राहायला माडी ।
आणि सदा तुझी
लाडी गोडी ।
Sanjay R.

Saturday, February 9, 2019

" प्रपोज "

कसं करायचं असतं प्रपोज
असाच तर असतो दिवस रोज ।
वेळ आणी तारीखेची
चालते नुसती मोजमोज ।
निघून जातं आयुष्य
राहून जातो प्रपोज ।
परत येतो दिवस तसाच
वेगळं नसतंच रोज रोज ।
जाऊ द्या विसरा सारं
करतो आज स्वतःलाच
प्रपोज प्रपोज प्रपोज ।
Sanjay R.

🌷🌹🌷

Thursday, February 7, 2019

" रोज डे आनंदाचा "

" रोज डे आनंदाचा "

दिवस आज गुलाबाचा
करा थोडा आनंदाचा ।
रोज रोज कुठे हो जमतं
वेळच नसतो क्षणाचा ।
दिवस आज गुलाबाचा
करा थोडा आनंदाचा ।
Sanjay R.

🌷🌹🌷

Wednesday, February 6, 2019

" मैत्री "

" मैत्री "

मैत्री कशी असावी
नको जीवाला जीव देणारी
हवी जीवाला जीव लावणारी
थोडं हासावणारी , थोडं रडवणारी
जीवनात आनंद पसरवणारी
संकटकाळी मदत देणारी
चटकन आठवण येणारी
दुःखातून बाहेर घेणारी
हवी अशीच मैत्री मला ।
Sanjay R.

Tuesday, February 5, 2019

" सूर्यही अंगणात आला "

काय ग सखे कसं सांगू तुला
आनंद स्वप्नपूर्तीचा किती मज झाला ।
प्रेम तुझ्या आणि माझ्यातलं
बघून सूर्यही कसा अंगणात आला ।
Sanjay R.