Friday, January 18, 2019

" तरास डोक्याले "

झाला तरास डोक्याले
पास्तावा आला मनाले ।
येळ गेली ना निंगून
सांगू आता कोनाले ।
पिकन मानलं पीक पानी
द्या लागलं सावकराले ।
उरली फकस्त आता माती
खाऊ काय घालू लेकरायले ।
इचार लय भारी आता
कराच कसं सांगा जगायले ।
Sanjay R.

Thursday, January 17, 2019

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ 2019

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे कवी कट्टा मंचावर कविता सादर करताना मी...





" ओलावते कडा माझ्या डोळ्यांची "

लेक तू ग माझी लाडाची
आहेस सावली झाडाची ।

तीळ तीळ झाली मोठी
जशी तुळस अंगणाची ।

फुलविले छान घर तुने
झालीस फुल तू वेलाची ।

होतीस तू लहान जेव्हा
दुडू दुडू कशी ग चालायची ।

क्षण आनंदाचे होते सारे
खुदु खुदु किती ग हसायची ।

वाटतं अजूनही आहेस तू छोटी
छकुली माझ्या तू स्वप्नांची ।

येईल तो दिवस जाशील दूर
ओलावते कडा माझ्या डोळ्यांची ।
Sanjay R.

Wednesday, January 9, 2019

" कसा रे बापू "

आस तुला रे कशाची बापू
राम कसा तू विसरला बापू
तू कलंकित केला बापू
विश्वसच उडाला बापू
नावात तुझ्या रे राम बापू
तुजविण रावण बरा बापू
Sanjay R.

Tuesday, January 8, 2019

" भारत माझा बदलला का "

वाटते भीती, तथ्य किती
कुणी कुणाला सांगेल का ?

एकोपा तर दिसतो अजूनही
अंतरातच तो हरला का ?

मीच म्हणतो, सारेच जाणतो
विश्वास खरंच सरला का ?

माणसा माणसात भेद कशाचा
विचारात तो फिरला का ?

शेजार्याला बघतो मी
त्रयस्थाला तो कळला का ?

सांगा मला जरा कुणी
भारत माझा बदलला का ?

नको नको ते विचार येतात
माझा मीच बदलला का ?
Sanjay R.