Sunday, December 16, 2018

" पोट्टे इचित्तर "

गावचे आमच्या
पोट्टे भाय इचित्तर ।
पोऱ्यायच्या नावानं
लिहे थे पतर ।
थातूर मातूर कागद भरून
लावे त्याले अत्तर ।
तिकीट नसे लिफाप्याले
दंड पडे बत्तर ।
पोट्टे आमच्या गावचे भौ
लयच इचित्तर ।
Sanjay R.


Saturday, December 15, 2018

" नदी "

आमच्या गावले
होती एक नदी ।
तपते लयच ना
उन्हाळ्या मधी ।
होत न्हाई पाऊस
पावसायात कदी ।
पार आटून गेली
रायली न्हाई सुदी ।
वाटन बी नाई तुमले
होती नदी कधी ।
लय हाल उन्हायाचे
पानी दिसते डोयामदी ।
Sanjay R.


" मैत्री एक आनंद "

तुझ्या आणि माझ्यातला
एक अतूट बंध ।
जसा अंगणात फुलला मोगरा
आणि दरवळतो सुगंध ।
चल वेचू या दोघेही यातून
मैत्रीचा आनंद ।
Sanjay R.


Friday, December 14, 2018

" झोपडी "

न्हाई भीती न्हाई छत
सताड उघडं दार ।
पैसा अडका काय कामाचा
श्रीमंत मनाले सांगा कायचा भार ।
सुखा दुखा मंदी एक सारे
देतेत यकमेकाले आधार ।
आनंदी सारे झोपडीत माह्या
ह्याच जीवनाचा माह्या सार ।
Sanjay R.


" तूच माझा श्वास "

जीवनात माझ्या तू आलास
सुख दुःखात तूच धीर दिलास ।
का रे अर्ध्यातच सोडून मज
असा रे तू निघून गेलास ।
सांग संख्या तुजविण मी
आता घेऊ कशी रे श्वास ।
स्मृती तुझ्याच रे मनात माझ्या
तुजविण नकोच वाटतो हा प्रवास ।
Sanjay R.