Saturday, December 8, 2018

" काळजात घाव "

झाला काळजात घाव
वाटतं निरंतर पाहावं ।
मनाला कशी ही हाव
विचारांची किती धाव ।
देऊ कुठले यासी नाव
प्रेम म्हणतात ते हेच राव ।
प्रेमा विना कुठे निभाव
जाल तिथे आपुला गाव ।
माणुसकीचा तिथेच ठाव ।
उरेल माणसाचे तिथेच नाव ।
Sanjay R.



Friday, December 7, 2018

" हवेत गारवा "

हवेत गारवा
संगे पावसाचा शिरला ।
हुडहुडी भरली
काहीतरी ठरवा ।

स्वेटर मपलर
रजई चा थोरवा ।
काहीही करा पण
थंडीला हरवा ।

पहाटेला शेकोटी
कुणीतरी पेटवा ।
शेकून घ्या अंग
थरथर हटवा ।

उन्हात बसून
चकाट्या पिटवा ।
प्रश्न थंडीचा
कसाही मिटवा ।
Sanjay R.



Thursday, December 6, 2018

" पैशाची किंमत "

माणुसकीची हो काय किंमत
पैश्या पुढे कुणाची हिम्मत ।

मनाशी तुमच्या कोण सम्मत
भरल्या खिश्याला सारीच दिम्मत ।

जीवन हेच एक झालंय गम्मत
जगण्यात आहे खरच जम्मत ।
Sanjay R.


Tuesday, December 4, 2018

" रंग माणसाचा "

वेगळाच का असा
रंग माणसाचा ।

अजबच वाटे थोडा
ढंग माणसाचा ।

जाड कुणी बारीक
देह माणसाचा ।

बोलका कुणी अबोल
संग माणसाचा ।

नकळे कधी स्वभाव
अंतरंग माणसाचा ।

स्वार्थी कधी तो निस्वार्थ
अर्थ माणसाचा ।

स्वतःलाच लुटतो तेव्हा
अंत माणसाचा ।
Sanjay R.



Monday, December 3, 2018

" रंग जीवनाचा "

आनंदच तर आहे
जीवनाचा आधार ।

वाटणार नाही न मग
आयुष्य एक भार ।

सुख दुःखाच्या वाटेवर
रोज करायचे प्रहार ।

त्यातूनच शोधायचे
उत्साहाचे बहार ।

भिजून जायचं त्यातच
हाच जगण्याचा एक सार ।

जन्म मृत्त्यूच्या प्रवासाची
वाट होईल अशीच मग पार ।
Sanjay R.