Wednesday, September 5, 2018

" जय गुरुदेव "

लहानाचा झालो मोठा
आई बाबा तुमची कृपा ।
शिकलो सवरलो
गुरुजी तुमची कृपा ।
उठतो बसतो जगतो
या समाजाची कृपा ।
लागतो देणें साऱ्यांचे
तेव्हाच मार्ग सोपा ।
Sanjay R.

Sunday, September 2, 2018

" मानुस किती कसा "

मानुस आता कसा
मानूसकीच इसरला ।
स्वार्थापायी सांगा
किती तो बिथरला ।

माणूस माणसाचेच
वढते मांग पाय   ।
नको वाटे त्याले
सख्खे बाप माय ।

मान पान इज्जत अब्रू
ठिवली त्यानं गहान  ।
म्हने ज्ञानी मोठा झालो
हावो मीच महान ।

चोरी चकारी भ्रष्टाचारी
तिकडच त्याच भान ।
लुटारू मी किती मोठा
थेच त्याची शान ।
Sanjay R.

Saturday, September 1, 2018

" नाम जी ने का "

जिंदगी है नाम जी ने का
भूल जावोगे दर्द सिने का ।
होगा सच सापना भी बस
दिलसे दिलको छु ने का ।
Sanjay R.

Wednesday, August 29, 2018

" कळी "

कोमळ सुंदर
आहेस तू कळी ।
गुंतले मन बघून
गालावरची खळी ।
आठवण ही तुझी
किती मला छळी ।
हवी हवी वाटे मला
फुलाची पाकळी ।
Sanjay R.

" वजाबाकी "

जीवनात चाले रोजच
बेरीज आन वजाबाकी ।
आनंदात जगून पहा
आयुष्य चार चाकी ।
Sanjay R.