तू आणि मी बस दोघंच
आला विचार सहजच ।
चांदणी दूर आकाशात
वेड लाविते मनात ।
बघायचं तुझ्या डोळ्यात
हसायचं थोडं गालात ।
ये ना सखे जवळ ये
दे हात माझ्या हातात ।
Sanjay R.
तू आणि मी बस दोघंच
आला विचार सहजच ।
चांदणी दूर आकाशात
वेड लाविते मनात ।
बघायचं तुझ्या डोळ्यात
हसायचं थोडं गालात ।
ये ना सखे जवळ ये
दे हात माझ्या हातात ।
Sanjay R.
गुलाब तू मोगरा तू
चाहुकडेची आनंद ।
फुलली तू हसली तू
हवाही झाली बेधुंद ।
शिरलीस तू श्वासात जेव्हा
चढली नशा मंद मंद ।
मोहरले कण कण सारे
संग तुझ्या मी बेधुंद ।
मिठीत माझ्या येताच तू
तुटून गेले सारे बंध ।
गळून पडल्या पाकळ्या परी
भरला मनात सुगंध ।
Sanjay R.
खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।
स्वप्नांनी थोडं मनाला छळावं
अंतराला थोडं सुख कळावं ।
आयुष्यानंही छान आनंदानं
परत परत मस्त जगून घ्यावं ।
दिवस संपले कि मग
शांत चित्तानं परत जावं ।
खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।
Sanjay R.
दूर जायचे कुठे
ही वाट दूर जाते ।
एकटे चालतांना
मनी आठवण येते ।
ठाव मजसी आहे
वाट कोण पहाते ।
अर्धांगिनी घरी ती
अतूट तीचे नाते ।
लेकरं छोटी छोटी
आस कुणास शोधते ।
वाटेवरती डोळे सारे
अंतरात ही वाट जाते ।
दार घराचे तुझ्यारे
वाट तिथेच जाते ।
Sanjay R.