Monday, May 7, 2018

प्रकाश मंद

असाच माझा हा छंद
कधी मन होतं बंधुंद ।

परासातला सुगंध
प्रकाश चांदणीचा मंद ।

वाटा अंतरातल्या रुंद
परी नाहीत कुठले बंध ।

सांग सखे तू मजला
होऊ दे मनास स्वछंद
Sanjay R.

Sunday, May 6, 2018

परी

नाकात नथनी
गालावर हसू
सांगा ना मला
दिसते का सासू

वर्हाडी लुगड्याला
पदर जरीचा ।
शोभला ना मला
वेश हा परीचा ।
Sanjay R.

Saturday, May 5, 2018

खो जाता हु

देखकर मै
मुसकुराहट तुम्हारी
न जाने क्यु 
बेचैन हो जाता हु ।

कुछ सपने कुछ यादे
तुम और हम
वक्त की आघोशमे
बस युही खो जाता हु ।
Sanjay R.

काम काम काम

करा पाहिले काम
तरच मिळेल आराम ।

प्रश्न पोटा पाण्याचा
मोजावे लागतात दाम ।

ऊन असो वा पाऊस
नाही कष्टाला विराम ।

महागाई भिडली आकाशी
बघूनच आता फुटतो घाम ।

जाइल जीव तेव्हाच आता
मिळेल जीवाला विश्राम ।

जाऊन वरच आता सारे
घेऊ श्री हरीचे नाम ।
Sanjay R.

Thursday, May 3, 2018

कविता गवसली

मला शब्दच सुचत नाही
सांगेल का कुणी काही।
शोधले शब्दांना मी दिशा दाही ।
मनातच गवसली कविता माही ।
Sanjay R.