Tuesday, December 12, 2017

" गुलाब "

अंगणात आज
फुलले गुलाब फुल ।
आनंद बहरला
गाली खुलला विपुल ।
नयन लाजले
चढली नजरेला झुल ।
Sanjay R.

Thursday, December 7, 2017

" धावाधाव "

बघुन तुझ्या डोळ्यातले भाव ।
दिसतय त्यात मज माझे नाव ।।
गुलाबी ओठांचा कसा हा प्रभाव ।
श्वासांची होते कीती धावाधाव ।।
Sanjay R.

Monday, December 4, 2017

" रम्य पहाट "

रम्य पहाट ही
गार धुंद वारा ।

फुलांनी बहरला
धरतीचा पसारा ।

निस्तेज झाला
चंद्र आणी तारा ।

लाल किरणांनी
डोकावतो सुर्य जरा ।

पाखरांच्या किलबीलीनं
जागी झाली धरा ।

मधुर घंटानाद
हाक देइ मंदिरा ।

जयघोष विठ्ठलाचा
देवाचीया द्वारा ।

जय हरी विठ्ल ।
जय हरी विठ्ठल

 म्हणा जरा जरा ।।
Sanjay R.

Friday, December 1, 2017

" खळी "

" चारोळी "
बघुन गालावर खळी तुझ्या
भान माझे हरपले ।
मनात बहरली कळी माझ्या
काटे गुलाबाचे करपले ।
Sanjay R.

" गंध प्रीतीचा "

रुप माझे मलाच
कळले नाही अजुन ।
दाखविले आरशाने मज
मन लाजरे आहे अजून ।
सजले नटले मी परी
नाही हसले मी अजुन ।
गंध प्रीतीचा माझ्या तुज
का कळला नाही अजुन ।
Sanjay R.