Friday, July 14, 2017

" दार मरणाचे "

स्वप्नांच्या या दुनियेत
आहे स्वागत सर्वांचे ।
विचार झालेत स्वैर
राज्य इथे दुष्टांचे ।
सफर अंतराळाची करा
घर तिथे चांदण्यांचे ।
भुतलावर चालाल तर
घाव झेला माणसांचे ।
आकशी चंद्राची शितलता
धरेवरी सुर्याची प्रखरता ।
विचारांचे बांध तुटले
पुर वाहताहेत रक्तांचे ।
आसुसलेली माणसं इथं
वैरी आहेत एकमेकांचे ।
नाही उरले काळीज कुठेच
ढीग लागले प्रेतांचे ।
सुर्यावरच जाउ आता
लाकडं वाचतील दहनांचे ।
कोण कुणाचा काय लागतो
उघडे दार मरणाचे ।
आसवांना नाही थारा
शब्द गुंजतात हास्याचे ।
Sanjay R

Wednesday, July 12, 2017

" ढगांची हजेरी "

रोजच ढग येतात
लाउन हजेरी फक्त
निघुन ते जातात ।
धरा बिचारी
काय तीच्या हातात ।
जगवते तरीही सारं
ओलावा तिच्या श्वासात ।
Sanjay R.

" हे जिंदगी "

कभी हसाती
कभी रुलाती ।
ए जिंदगी तु
साथ तो निभाती ।
चाहता तुझे मै
तो तु पास होती ।
न चाहु तब भी
जीना तु सिखाती ।
जिंदगी मेरी तु
मै हु तेरा साथी ।
चल साथ चले दुर
है वक्त अभी बाकी ।
Sanjay R.

" ये ना रे पावसा "

काय रे पावसा
काय तुझ्या मनात ।
ढगं तर आहेत
बरीच गगनात ।
ये ना जरा
पडुन जा शेतात ।
वाचेल नुकसान
आनंद येयील घरात ।
येत नाहीस ना तु
सारच कसं अंधारात ।
आता तुझ्याच येण्यानं
मिटेल चिंता क्षणात ।
रुसु नकोस असा
भिजव मला पावसात ।
ये ना रे पावसा
काय तुझ्या मनात ।
Sanjay R.

Tuesday, July 11, 2017

" नजर "

निरागस हसरा
गोड तुझा चेहरा ।
सुंदर तयात भाव
दिसे छान लाजरा ।
भावली मनास माझ्या
तुझी हीच  तर् हा ।
चोरट्या नजरेनच तु
एकदा बघना जरा ।
Sanjay R.