कभी हसाती
कभी रुलाती ।
ए जिंदगी तु
साथ तो निभाती ।
चाहता तुझे मै
तो तु पास होती ।
न चाहु तब भी
जीना तु सिखाती ।
जिंदगी मेरी तु
मै हु तेरा साथी ।
चल साथ चले दुर
है वक्त अभी बाकी ।
Sanjay R.
Wednesday, July 12, 2017
" हे जिंदगी "
" ये ना रे पावसा "
काय रे पावसा
काय तुझ्या मनात ।
ढगं तर आहेत
बरीच गगनात ।
ये ना जरा
पडुन जा शेतात ।
वाचेल नुकसान
आनंद येयील घरात ।
येत नाहीस ना तु
सारच कसं अंधारात ।
आता तुझ्याच येण्यानं
मिटेल चिंता क्षणात ।
रुसु नकोस असा
भिजव मला पावसात ।
ये ना रे पावसा
काय तुझ्या मनात ।
Sanjay R.
Tuesday, July 11, 2017
" नजर "
निरागस हसरा
गोड तुझा चेहरा ।
सुंदर तयात भाव
दिसे छान लाजरा ।
भावली मनास माझ्या
तुझी हीच तर् हा ।
चोरट्या नजरेनच तु
एकदा बघना जरा ।
Sanjay R.
Saturday, July 8, 2017
" मन "
नको विचारुस कोन
तु तर आहेस माझे मन ।
आठवणीत तुझ्या मी
जगतो एक एक क्षण ।
तु तर आहेस माझे मन
नी मी आहे तुझेच मन ।
Sanjay R.
" स्वप्न जगुन घ्यावे "
शब्द तुझे असे की
त्यातच रमुन जावे ।
स्वतःला ठेउन तिथे
स्वप्नात जगुन घ्यावे ।
मनातली एक एक परत
उलगडुन जेव्हा बघावी ।
हळुच मग गालात छान
थोडेसे हसुन घ्यावे ।
आठवणींचा अथांग सागर
तयात थोडे डुंबुन घ्यावे ।
आनंदाचे क्षण न क्षण
सोबत तुझ्या लुटुन घ्यावे ।
Sanjay R.