Monday, May 15, 2017

" छत उडुन गेले "

भरले गगनी आभाळ
निळ्या काळ्या ढगांनी ।
वाहे वारा सोसाट्याचा
दाही दिशांनी ।

अंतरात भरली धडकी
वेग आला श्वासांना ।
छत नेले उडवुन
रोकु कसा मी आता
झरणार्या आसवांना ।

थेंब रक्ताचा मी लावला
छत चार भिंतीचे बांधताना ।
नशीबाचा फेरा कसा
हुंदका कंठातही मावेना ।
Sanjay R.

" तुझ्या हवाली "

कानात झुमका
ओठावर लाली ।
नजरेत तुझ्या
नजर मिळाली ।
हास्य शोभते
तुझ्याच गाली ।
केले मी काळीज
तुझ्या हवाली ।
मनातली माझ्या
राणी तु झाली ।
Sanjay R.

Saturday, May 13, 2017

" सितारा "

वाटतं मला पण
दिसावं छान सुंदर ।
बंद डोळ्यात तुझ्या
रहावं अगदी निरंतर ।
द्यावे वळण केसांना
लावावा थोडा पावडर ।
ओठांना लाली गुलाबी
डोळ्यांना काळी कोर ।
नटुन थटुन मिरवायचं
जशी चंद्राची चकोर ।
Sanjay R.

Wednesday, May 10, 2017

" रात्र पुनवेची "

चंद्राला वेड आहे चांदणीचे
खेळ लपाछपीचा तो खेळतो ।
बघुन तेज चांदणीचे अमावसेला
रात्र पुनवेची तो फुलवतो ।
Sanjay R.

" नाही हे बंधन "

लग्न हेची नाही बंधन
जिवनातले मजबुत नाते ।
दोन मनाच्या नावेवरती
विश्व सारेची तरुन जाते
वर्षा मागुन वर्षे सरता
उभे सुखाचे घरकुल होते ।
सुःख दुःखाच्या अनेक वाटा
हळुवार निघती इथेच काटे ।
Sanjay R.