Wednesday, May 10, 2017

" रात्र पुनवेची "

चंद्राला वेड आहे चांदणीचे
खेळ लपाछपीचा तो खेळतो ।
बघुन तेज चांदणीचे अमावसेला
रात्र पुनवेची तो फुलवतो ।
Sanjay R.

" नाही हे बंधन "

लग्न हेची नाही बंधन
जिवनातले मजबुत नाते ।
दोन मनाच्या नावेवरती
विश्व सारेची तरुन जाते
वर्षा मागुन वर्षे सरता
उभे सुखाचे घरकुल होते ।
सुःख दुःखाच्या अनेक वाटा
हळुवार निघती इथेच काटे ।
Sanjay R.

Saturday, May 6, 2017

मन माझे

गुंतले गं मन माझे
मोकळ्या तुझ्या केसांत ।

हळुच येउन वारा
ऐक सांगतो कानात ।

हळुच गोड हसणे
बघतो तुझ्या गालात ।

शब्द रुपी अलंकार
वसती तुझ्या ओठांत ।

अडकले मन माझे
सुंदर तुझ्या रुपात ।

जागतो सारी रात्र
बघण्या तुज स्वप्नात ।

शोधतो भाव मनाचा
तुझ्याच मी डोळ्यात ।
Sanjay R.

" मोगरा फुलला परसात "

मोगरा फुलला परसात
सुगंध दरवळला अंगणात ।

भरला गंध कणा कणात
एक एक श्वास अंतरात ।

तनमन झुलले आनंदात
हरपले  प्राणही क्षणात ।

न उरलो मी माझ्यात
गुंतलो बघ मी तुझ्यात ।

काय ही जादु या मोगर्यात
बहरला कसा तुझ्यामाझ्यात ।
Sanjay R.

 

" सुई आणी दोरा "

काय सांगु मी दादा
नशीबाचा आहे हा फेरा ।

लावले जागोजागी ठिगळं
घेउन सुई आणी दोरा ।

नको तानुस तु जास्त
होइल उघडा  सारा पसारा ।

नाही सरणार दुःख माझी
नियतीचा हाच इशारा ।

काळ्या अंधारात शोधतो मी
माझ्या मनातला तारा ।

देवा उगवतीच्या सुर्या संगे
होवु दे जिवनात प्रकाश सारा ।
Sanjay R.