Thursday, April 13, 2017

" सिंचन "

सिंचीले पाणी
मिळुनी तयांनी ।
उगवले रोप आणी
बहरले फुलांनी ।
Sanjay R.

" मण भर ओझं "

जिवन म्हटलं की
तणाव हा आलाच ।
आनंदाच्या सोबत
दुर त्याला साराच ।

मण भर ओझे
करी डोक्याला भार ।
नौका जिवनाची
होयील कशी पार ।

आहे सुरेख जिवन
भरलय त्यात सुख: ।
चविला थोडं हवंच ना
क्षणभराचं दुखः ।
Sanjay R.

Wednesday, April 12, 2017

" परी झालीस तु नारी "

काय गं पोरी
नशीब तुझं भारी
लाडात वाढली
आई बापाची परी
लग्न करुनआली
परक्या दारी
विसरुन बालपण
होतेस तु नारी
सासरी ओढतेस
कामाची दोरी
थकली भागली
नसतो विचार तरी
आता शिण घालवाया
जा गं तु माहेरी
आई बापाची माया
आहे तुझ्याच वरी
Sanjay R.

" परी झालीस तु नारी "

काय गं पोरी
नशीब तुझं भारी
लाडात वाढली
आई बापाची परी
लग्न करुनआली
परक्या दारी
विसरुन बालपण
होतेस तु नारी
सासरी ओढतेस
कामाची दोरी
थकली भागली
नसतो विचार तरी
आता शिण घालवाया
जा गं तु माहेरी
आई बापाची माया
आहे तुझ्याच वरी
Sanjay R.

Tuesday, April 11, 2017

" आरसा "

काय पण नशीब
त्या आरशाचे
सदा असतेस तु
पुढ्यात त्याच्या ।
मलाही लागला
छंदच आता
शोधतो तुला
अंतरात त्याच्या ।
Sanjay R.