अनंताच्या प्रवासात
सारेच आहेत सोबतीला ।
मार्ग क्रमण करता करता
टेकला रवी क्षितीजाला ।
सोपवुनी साम्राज्य चंद्रासी
चालला सुर्य अस्ताला ।
होइल रजनी सम्राज्ञी
चांदण्या तिच्या दिमतीला ।
खेळ स्वप्नांचा परत एकदा
होइल प्रदक्षीणा विश्वाला ।
Sanjay R.
Saturday, March 18, 2017
" प्रदक्षीणा विश्वाला "
Thursday, March 16, 2017
पाउस वारा
रीम झीम रीम झीम
पावसाच्या धारा ।
सोबतीला आहे
सोसाट्याचा वारा ।
गडगडतं आभाळ
लखलखाट सारा ।
गव्हाच्या पिकाला
बसलाय मारा ।
शेकर्याची व्यथा
नाही उरणार थारा ।
Sanjay R.
" आभास "
हास्याची एक कोर
नजरेत तीर ।
मनात आहेस तु
झालो मी अधीर ।
असच असतं का
प्रेमाचं नातं ।
मनाच्या देव्हार्यात
जळती वातं ।
प्रेम आहे अनोखा
चमचमता तारा ।
मनास सुखावणारा
हलकाच वारा ।
प्रेम आहे श्वास
नाही नुसता भास ।
कोपर्यात मनाच्या
अखंड चाले ध्यास ।
Sanjay R.
Tuesday, March 14, 2017
" एक प्याला "
फासुन रंग चेहर्यावर
बरेच काल फिरत होते ।
ओळखीचे असुनही सारेच
अनोळखीच भासत होते ।
लाल पिवळ्या निऴ्या रंगात
सारे आनंदाने हसत होते ।
पिउन भांगेचा एक प्याला
कुणी फक्त रडत होते ।
Sanjay R.
Sunday, March 12, 2017
Subscribe to:
Posts (Atom)