Thursday, March 16, 2017

" आभास "

हास्याची एक कोर
नजरेत तीर ।
मनात आहेस तु
झालो मी अधीर ।

असच असतं का
प्रेमाचं नातं ।
मनाच्या देव्हार्यात
जळती वातं ।

प्रेम आहे अनोखा
चमचमता तारा ।
मनास सुखावणारा
हलकाच वारा ।

प्रेम आहे श्वास
नाही नुसता भास ।
कोपर्यात मनाच्या
अखंड चाले ध्यास ।
Sanjay R.

Tuesday, March 14, 2017

" एक प्याला "

फासुन रंग चेहर्यावर
बरेच काल फिरत होते ।
ओळखीचे असुनही सारेच
अनोळखीच भासत होते ।
लाल पिवळ्या निऴ्या रंगात
सारे आनंदाने हसत होते ।
पिउन भांगेचा एक प्याला
कुणी फक्त रडत होते ।
Sanjay R.

Sunday, March 12, 2017

" ताळ मेळ "

संपता संपत नाही वेळ
मनात चाललाय खेळ ।
विचारांची झली भेळ
बसवायचा कसा मेळ ।
Sanjay R.

Saturday, March 11, 2017

" रंगच न्यारा "

काय सांगु
तुझा रंगच न्यारा
गाल गुलाबी
ओठ सितारा ।
उडते केस
छळतो वारा ।
नजरेत तुझ्या
शोधतो तारा ।
Sanjay R.

Friday, March 10, 2017

" उजाड धरा "

तोच चंद्र तोच तारा
झोंझावत येणारा
वादळी वारा ।
सागराचा कधी
तर नदीचा किनारा ।
पक्षांची किलबील
सृष्टीचा नजारा ।
जिकडे तिकडे त्यात
माणसांचा पसारा ।
जशा ओसंडुन वाहणार्या
पावसाच्या धारा ।
सोबतीला जिवघेण्या
टप्पोर्या गारा ।
थकली भागली
उजाड धरा ।
थोडासा विचार
सारेच करा ।
संपलं हे सारं तर
काय असेल तर्हा ।
थांबवा पर्यावरणाशी
खेळणे जरा ।
Sanjay R.