फासुन रंग चेहर्यावर
बरेच काल फिरत होते ।
ओळखीचे असुनही सारेच
अनोळखीच भासत होते ।
लाल पिवळ्या निऴ्या रंगात
सारे आनंदाने हसत होते ।
पिउन भांगेचा एक प्याला
कुणी फक्त रडत होते ।
Sanjay R.
Tuesday, March 14, 2017
" एक प्याला "
Sunday, March 12, 2017
Saturday, March 11, 2017
" रंगच न्यारा "
काय सांगु
तुझा रंगच न्यारा
गाल गुलाबी
ओठ सितारा ।
उडते केस
छळतो वारा ।
नजरेत तुझ्या
शोधतो तारा ।
Sanjay R.
Friday, March 10, 2017
" उजाड धरा "
तोच चंद्र तोच तारा
झोंझावत येणारा
वादळी वारा ।
सागराचा कधी
तर नदीचा किनारा ।
पक्षांची किलबील
सृष्टीचा नजारा ।
जिकडे तिकडे त्यात
माणसांचा पसारा ।
जशा ओसंडुन वाहणार्या
पावसाच्या धारा ।
सोबतीला जिवघेण्या
टप्पोर्या गारा ।
थकली भागली
उजाड धरा ।
थोडासा विचार
सारेच करा ।
संपलं हे सारं तर
काय असेल तर्हा ।
थांबवा पर्यावरणाशी
खेळणे जरा ।
Sanjay R.
" मन बेचैन "
बघुन तुला माझं सखे
का गं मन होतं बचैन ।
वाटत घ्याव तुला कवेत
नी टिपावा कणन कण ।
धडधडतं ह्रुदय माझं
श्वासही होतात मंद ।
आठवणीनही तुझ्या मी
स्वप्नात होतो बेधुंद ।
फिरवाचे बोट केसातुन
प्यायचा मधु ओठातुन ।
वाटतं संपुच नये ही रात्र
निघवत नाही मिठीतुन ।
फुलली बहरली रातराणी
दरवळलेलं सुगंधीत वारं ।
तु आणी मी दोघच आपण
व्हायचं एक विसरुन सारं ।
Sanjay R.