Saturday, March 4, 2017

" संपउन टाका सारे "

सुर्य चंद्र तारे
प्रतीक्षेत सारे ।
दिवस आणी रात्र
टाका संपउन सारे ।
माणसांचे भारे
नसतील इथे वारे ।
उजाड होइल पृथ्वी
नसतील खिडक्या आणी दारे ।
चहुकडे दिसतील
नुसते हाडांचे पसारे ।
Sanjay R.

" जायचे आहे अंती "

घेउ नकोस विश्रांती
सुरु असु दे भ्रमंती ।
थांबला तो संपला 
श्रमा शिवाय कुठे शांती ।
उरेल कोण इथे
जायचे तर आहेच अंती ।
Sanjay R.

Monday, February 27, 2017

" थेंब पाण्याचा "

आहेना हेच खरे
पळसाला पाने तीन ।
सुर्य लागला तापायला
येयील जरासा शीण ।

राना वनात फुलला पळस
उधळला रंग लाल ।
पशु पक्षी माणसं सारी
होतील पाण्याविना बेहाल ।

ढग काळा शोधण्यासाठी
नजरा उठतील आकाशी ।
वाचवुन थेंब पाण्याचा
भागवायची तहान जराशी ।
Sanjay R.

Thursday, February 23, 2017

" मोगर्याची कळी "

मोगर्याची कळी
गालावर खळी ।
मनात माझ्या
सोनेरी साखळी ।
ठेवली मी तुज
अंतरात स्थळी ।
आठवण तुझी मज
क्षणोक्षणी छळी ।
Sanjay R.

Wednesday, February 22, 2017

" कृष्ण सावळा "

रंग तुझा गोरा
मी असा काळा
तु माझी राधा
मी कृष्ण सावळा ।

हसणं आणी मुरडणं
आवडतात तुझ्या अदा ।
गुंतलय मन तुझ्यात
झालो मी फिदा ।

नको अशी रागाउस
नको दुर जाउस ।
श्वासातही तुच माझ्या
नको अंत पाहुस ।
Sanjay R.