मोगर्याची कळी
गालावर खळी ।
मनात माझ्या
सोनेरी साखळी ।
ठेवली मी तुज
अंतरात स्थळी ।
आठवण तुझी मज
क्षणोक्षणी छळी ।
Sanjay R.
Thursday, February 23, 2017
" मोगर्याची कळी "
Wednesday, February 22, 2017
" कृष्ण सावळा "
रंग तुझा गोरा
मी असा काळा
तु माझी राधा
मी कृष्ण सावळा ।
हसणं आणी मुरडणं
आवडतात तुझ्या अदा ।
गुंतलय मन तुझ्यात
झालो मी फिदा ।
नको अशी रागाउस
नको दुर जाउस ।
श्वासातही तुच माझ्या
नको अंत पाहुस ।
Sanjay R.
" पारा "
नेहमीच असतो तुझ्या
का नाकावर राग ।
सदान कदा चिड चिड
थोडी हसायला लाग ।
हसते जेव्हा तु
खरच छान दिसतेस ।
नकऴत मग तु
मनात जाउन बसतेस ।
उन्हाळा येतोय आता
असु दे खाली पारा ।
मध्यान्ह रात्री रोज
चमकु दे तारा ।
Sanjay R.
Friday, February 17, 2017
" हसत रहा "
बघुन हसरा तुझा चेहरा
वाटतं घ्यावा एक गजरा ।
माळावा तुझ्या केसात
आणी विचारावं
दिसतो किती साजरा ।
तु अशीच हसत रहा
आवडतो मज
भाव तुझा लाजरा ।
Sanjay R.
Thursday, February 16, 2017
" हरवलं बालपण "
गेलं ते हसणं खिदळणं
संपली ती मस्ती ।
मोठे झालो ना आता
हरवलं हो ते बालपण ।
पाण्यातल्या बोटी आणी
आकाशातली विमानं
कागदाची का असेना
किती होती श्रीमंती ।
नव्हता खिशात पैसा
पण नव्हती चिंता कशाची ।
नाव पैसा सारच आलं
तरी संपत नाही भ्रमंती ।
काहीही खा काहीही प्या
विचारांना अफाट गती ।
आता मारा ओषधांचा
शरीराची झाली क्षती ।
Sanjay R.