Thursday, January 5, 2017

" चार ओळींची गम्मत "

चार ओळीची बघा गम्मत
शब्दांशी जुळतात शब्द
उकलतो त्यातुन भावार्थ
प्रसवते अनोखी जम्मत
Sanjay R.

Friday, December 30, 2016

" शुभेच्छा नव वर्षाच्या "

हवेत आहे आज थोडासा गारवा
झुळ झुळ वाहते मस्त ही हवा ।
परतिला निघाला पक्षांचा थवा ।
संपतय उद्या हे वर्ष सोळा आणी
वर्ष सतरा घेउन येयील दिवस नवा ।
शुभेच्छा नव वर्षाच्या संगे आनंदाचा ठेवा ।
Sanjay R.

Thursday, December 29, 2016

" अर्थ "

करावा कसा परमार्थ
येतो आडवा स्वार्थ ।
जिवनात न उरे अर्थ
होइ पावलो पावली अनर्थ ।
Sanjay R.

Sunday, December 25, 2016

" प्रकाशीत कविता "

दैनिक तरूण भारत नागपूर आसमंत पुरवणीत आज प्रकाशित
दिनांक -25.12.2016
  Merry Christmas Friends

Friday, December 23, 2016

" सोनेरी कळी "

गोड गालावर खळी
जशी सोनेरी कळी ।
जळी स्थळी पाताळी
शोधतो मी साखळी ।
बहरलेल्या धरेवर
एक अनोखी पाकळी ।
Sanjay R.