Friday, December 23, 2016

" सोनेरी कळी "

गोड गालावर खळी
जशी सोनेरी कळी ।
जळी स्थळी पाताळी
शोधतो मी साखळी ।
बहरलेल्या धरेवर
एक अनोखी पाकळी ।
Sanjay R.


Tuesday, December 20, 2016

" रंगीत गगन "

आनंदाचे क्षण
उत्साही मन
सोबतीला कोन
मावळतीचा सुर्य
आणी रंगीत गगन
Sanjay R.

Sunday, December 18, 2016

" विदर्भ माझा "

विदर्भाचा थाटच न्यारा
कधी निघतात घामाच्या धारा ।
तर कधी गार गार वारा
चढ उतार करतो पारा ।

बोली इथली वर्हाडी
तुया माह्यात आहे गोडी ।
सच्चा मनाचे प्रेमळ गडी
लिन होउन हात जोडी ।

निसर्गानं दिली हिरवी वनराई
वाघोबाची इथे नाही नवलाई ।
संत महात्म्यांची होती पुण्याई
इथल्याच मातीतली थोर जिजाई ।
Sanjay R.

Saturday, December 17, 2016

" नको रे धाडु आम्हा वृद्धाश्रमी "

नको रे धाडु तु
आम्हा वृद्धाश्रमी ।
माया दीली तुज
आम्ही का कमी ।

आहेस तु आमच्या
पोटचा गोळा ।
विचार कसा आला
मनात असला खुळा ।

किती रात्री जागल्या
आम्ही त्या काळ्या  ।
बाबांचे कष्ट कसा
विसरलास रे बाळ्या ।

प्रेमळ तुझ मन का
झाल इतक कठोर  ।
थकलो रे आम्ही आता
नको होउस निष्ठुर ।

मोठा तु झालास
आणी खुप हो मोठा  ।
नशीबच खोटं आमचं
पैसाही रे हा खोटा ।
Sanjay R.

" गंध मोगर्याचा "

असेल वादळ
जरी या मनात ।
आहेस तुच सखे
माझ्या ह्रुदयात ।
असतील चांदण्या
कीतीही गगनात ।
तु चंद्रिका जशी
एकच आकाशात ।
गंध मोगर्याचा जसा
पसरला अंगणात ।
शोधतो तुज मी
माझ्या प्रत्येक श्वासात ।
सुहास्य वदन तुझे
ठेवीले मी नेत्रात ।
शब्दनी शब्द तुझा
कोरला मी काळजात ।
Sanjay R.