Thursday, December 15, 2016

" धाव "

बघता डोळ्यातले तुझे भाव
उलटली माझ्या जिवाची नाव
नाही उरला मनास मनाचा ठाव
आवरु कशी मी विचारांची धाव
Sanjay R.

Monday, December 12, 2016

" मोसम थंडीचा "

प्रिये तुझा मी दिवाना
सायंकाळ थंडिची
वाटे मोसम सुहाना ।
तिर तुझ्या नजरेचा
साधतो ह्रदयी निशाना ।
भेटण्यास तुज आता
शोधतो मी बहाना ।
अधिर झाले मन
शब्द कवितेस मिळेना ।
सपव ओढ मनाची
उमलु दे आता फुलांना ।
Sanjay R.

Sunday, December 11, 2016

" प्रकाशित "

दैनिक तरूण भारत नागपूर आसमंत पुरवणीत आज प्रकाशित 11.12.2016

Saturday, December 10, 2016

" जिवनाच्या बाजु "

सुख आणी दुःख
जिवनाच्या दोन बाजु ।
सोबत ही हवीच
मोजायला तराजु ।
Sanjay R.

" थंडी फार आहे "

सकाळी उठुन
बाहेर निघाल्यावर कळतं ।
थंडी फार आहे
शरीर थंडीत कसं कळवळतं ।
म्हणतात ना गरम रक्त
फारच सळसळतं ।
आणी थंड
काय हळहळतं ।
ज्याचं जळतं ना
त्यालाच कळतं ।
आणी हो ज्याला कळतं
त्यालाच पोळतं ।
जास्तच झालं तर
मात्र मळमळतं  ।
Sanjay R.