Tuesday, November 29, 2016

" सौंदर्य ज्योती "

नाकात नथनी
केसात गजरा ।
वाटे डोइवरी
फुलला मोगरा ।
कोर काजळाची
नजर खाली ।
गालांना शोभे
ओठांची लाली ।
कपाळी बिंदी
गळ्यात मोती ।
रुपानं खुलली
सौदर्य ज्योती ।
Sanjay R.

Friday, November 25, 2016

काम काम काम

हात धरुन पाठीमागे
लागलय काम ।
बसल्या बसल्याच
कसा निघतो घाम ।
मनात विचारांचा
लागलाय जाम ।
श्वास घ्यायलाही
नाही फुरसत
जिवाचा होतो बाॅम ।
जाउ दे फुटु दे एकदाचा
होइल सुम साम ।
Sanjay R.

Thursday, November 24, 2016

" ह्रुदयाचे दार "

वाढली कशी थर थर
पडतोय थंडीचा मार ।
वाटे रात्र महा कठीण
तरीही उघडे ह्रुदयाचे दार ।
दुर असे मिणमीणती पणती
वाटे मनास तिचाच आधार ।
विचारांची होताच गर्दी
ह्रुदयात पेटतो विखार ।
Sanjay R.

Wednesday, November 23, 2016

" मनातला बंध "

अजुनही याद आहे मज
तुझा तो पहीला स्पर्श ।

केसात माळला गजरा त्या
बहरलेल्या मोगर्याचा गंध ।

उत्सव आकाशी तारकांचा
हलका गारवा नी मन बेधुंद ।

शोधतो अजुनही ती रात्र
आणी मनात गुंफलेला बंध ।
Sanjay R.

Tuesday, November 22, 2016

" माझे आई "

जगती थोर
माझी आई ।
गीत गाते
गोड अंगाई ।
निज रे बाळा
गाई गाई ।
कवेतले तान्हुले
झोपी जाई ।
ममता तीची
तिच्याच ठाई ।
प्रेम वात्सल्य
माझे आई ।
Sanjay R.