मोठा इतका मी झालो बघा
हरवले माझे ते बालपण ।
वर्षा मागुन गेली वर्ष
नाहीच उरलं काही पण ।
केव्हा सरलं कळलच नाही
हसणं खेळणं रुसणं रागावणं ।
आईचे लाड बाबांचा राग
शाळेची मस्ती मास्तरांची धास्ती ।
कधी अभ्यास टिफीन खास
मित्रांची मैत्री तर कधी कुस्ती ।
नको नको ते सारे करायचे
लपुन छपुन सिनेमे बघायचे ।
काढायची कधी मुलींची छेड
कधी मनाला लागायचे वेड ।
संपले सारे उरल्या आठवणी
बालपण परत देइल का कोणी ।
Sanjay R.
Monday, November 14, 2016
" देइल का कोणी परत बालपण "
Tuesday, November 8, 2016
" रुप तुझे "
मोकळे केस तुझे
वेडावतात मज ।
डोळ्यातला भाव
करी बेधुंद मज ।
गोड गुलाबी ओठ
हवे हवे वाटे मज ।
बघुन रुप तुझे
तुझाच व्हायचे मज ।
Sanjay R.
Monday, November 7, 2016
" निवांत "
नाही मजला ठाव
झालेत कीती सांगु
मनावर माझ्या घाव ।
नको वाटतं सारं
दुर त्या काठावर
उभी जशी एक नाव ।
चिंतेचे सावट मनी
दिसेलका माझा गाव ।
आठवणींचा उभार
काढ डोहातुन मज
देवा तु तरी पाव ।
नको आता एकांत
मन झाले अशांत ।
आहे एकच खंत
नको संपवु सारे
कर मज निवांत ।
Sanjay R.
" जिवन धारा "
कुणास मिळतो उबदार वारा
तर कुणी झेलतो थंडीचा मारा ।
कसा हा सारा जिवनाचा फेरा
नशीबाशी जुळते जिवनाची धारा ।
Sanjay R.
Thursday, November 3, 2016
" हास्य "
बघुन हास्य तुझे
मीही हसलो गालात ।
गुरफटलो तुझ्यात इतका
ठेवले तुज ह्रुदयात ।
जडला छंद मज आता
नाही उरलो कशात ।
भिरभीरते नजर ही अशी
शोधतो मी मज तुझ्यात ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)