सुर्याच्या किरणांसोबत
दरवळतो सुगंध गुलाबाचा ।
संचारतो आनंद आणी उत्साह
झालो चातक मी श्वासाचा ।
रोज नवरंगी फुलांना
घेउन येते एक नवी सकाळ ।
वाटते केसात तुझ्या माळुनी
वेचावे गुलाबी हास्य मधाळ ।
Sanjay R.
Saturday, October 22, 2016
" नवी सकाळ "
" विचार "
नको करुस काहीच तु
आत्मचिंतन हे नाही बरे।
उगाच ताप नको डोक्याला
झालेत वेडे खुप सारे ।
स्वच्छदी तु जगुन बघ
खळखळुन थोडे हसुन बघ ।
फसवे इथे आहे सारे
दिवस आजचा जगुन बघ ।
कष्टा विना नाही फळ
पावलो पवली आहेत गळ ।
निर्धार पक्का हवा मनाचा
जिवनाला मग येयील बळ ।
Sanjay R.
Friday, October 21, 2016
" एक सकाळ "
रोजचीच एक
नेहमीसारखी सकाळ ।
फेकली सुर्यानं
प्रकाशाची माळ ।
दुर मंदीरात चाले
विठ्ठल नामाचा गजर ।
धावपळ सार्या जनांची
आहे भुकेले पोट हजर ।
पोट बघुन छोटे मोठे
भुकेचा तसाच आकार ।
अत्रुप्त नेहमीच आतमा
नाही कशालाच नकार ।
Sanjay R.
Tuesday, October 18, 2016
" आली दिवाळी "
” आली बघा दिवाळी ”
आली बघा दिवाळी
चला जाउ खरेदिला ।
खिशात नाही पैसा
कर्ज काढुया खर्चाला ।
चंपु गंपुला नवा शर्ट
हवी साडी रमीला ।
फाटका शर्ट टाचुन घेउ
चालेल मग दिवाळीला ।
मिठाइ फटाके महाग फार
चिवडाच ठेउ फराळाला ।
पावसान यंदा सार नेल
गवत उरलय उपासाला ।
sanjay R.
Sunday, October 16, 2016
" चोर कवितेचे "
" कविता चोर "
आजकालचे चोर भाउ
लयच झाले गा भारी ।
त्यायले कायबीन दिसो
चोराटी त्यायची असते तयारी ।
ढुंडुन ढुंडुन शब्दायले
लिवतो आमी कविता ।
इचीन तं ह्यो खोडुन नाव
दाबते आमाले जीता ।
तोंड दाबुन सहन करतो
यायच्या बुक्क्याचा मार ।
मानतो त्याले आमी मोठा
एफ बी वरचा यार ।
ग्यान सांगते आमालेच
काय झाल घेतलीतं ।
शब्दायले जलम का
तु एकल्यानच देतं ।
लय हायेत मोठ्ठे कवी
थेतं काइ नाइ मनत ।
दोन लायनी लिवुन तु
बसते आमच्यावर जयत ।
सांगु नको कोनाले
हे तुयी हाये कविता ।
पटवाचं हाये मलेबी
लिवतो मी बीन गीता ।
Sanjay Ronghe
Nagpur.