Wednesday, October 12, 2016

" नाव जिवनाची लागेल पारी "

कवितेला तुझ्या
दुखाः ची झालर ।
पुढे अजुन बघ
आहे आनंदाची घागर ।

सुखापुढे दुखः
होते अती भारी ।
हिरमुसलेलं मन
करी जिवन विषारी ।

सुख आणी दुखः
दोन्ही एका दारी ।
नाव जिवनाची
लागेल मग पारी ।
Sanjay R.

" उत्तर प्रश्नाचे "

काही प्रश्नांना
नसते उत्तर ।
प्रश्न भलेही
असो सत्तर ।
शोधता शोधता
सरते जिवन ।
प्रश्नच उरतो
असतो गहन ।
नसता उत्तर
चिंता भारी ।
मनास बोचे
तिक्ष्ण तुतारी ।
शेवटाला मागे
उरते शुन्य ।
धडपड सारी
होण्यास धन्य ।
Sanjay R.

Sunday, October 9, 2016

" जाउ या चला खरेदीला "

आले सणासुदीचे दिवस
जाउ या चला खरेदीला ।
गंपुला शर्ट प्यांट घेउन झाला
निघाला दम वस्तु शोधायला ।
बायकोनं घेतली मोरपंखी साडी
फिरलो बाजार मॅचिंग बघायला ।
जिकडे तिकडे माणसांचाच बाजार
शेवटी कंटाळलो तिथल्या गर्दीला ।
अबोला सांगे घरी आलो तेव्हा
पाकीट मोठ्ठे पाहीजे खरीदायला  ।
Sanjay R.

Saturday, October 8, 2016

" मन "

रुपानं तुझ्या केलं वेडं
मन सारखं करतय पिच्छा ।
खुप वाटतं मला
घ्यावा तुझ्या गालाचा गुच्चा ।
कळालं का तुला
आहे कीती मी मनाचा सच्चा ।
बर्याच दिवसांपासुन
घेउन मी फिरतोय फुलांचा गुच्छा ।
तु फक्त हो म्हण
करील पुर्ण सार्या तुझ्या ईच्छा ।
Sanjay R

Friday, October 7, 2016

" स्वप्नांचा ध्यास "

एक लांब खोल श्वास
सुगंध फुलांचा खास ।
नेत्रांना शोधाचा हव्यास
मनात स्वप्नांचा ध्यास ।
काय ते असेल खास
सदा चालती प्रयास ।
क्षणात बदलती कयास
छळतात मज आभास ।
उलगडे ना जिवनाचे तास
का झालो तुझाच मी दास ।
Sanjay R.