Thursday, October 6, 2016

" घरटे उडुन गेले "

गेले सुकुन झाड
का फुटेल पालवी तया ।
घरटे उडुन गेले
उरली ना कुणाची माया ।
वणवण भटकतो आता
सुकुन गेली ही काया ।
मन झाले निरर्थ
तुटला जिवनाचा पाया ।
Sanjay R.

Saturday, October 1, 2016

" तु आणी मी "

बघुन तुझ्या
रुपास मी ।
गेलो विसरुन
मलाच मी ।
हास्स्य तुझे
आनंद मी ।
क्षणी दुखा:च्या
उदास मी ।
मनात तु
तुझ्यात मी ।
नेत्रात शोधतो
का तुझाच मी ।
Sanjay R.

Friday, September 30, 2016

" झाले सारे उजाड "

पिळवटलेले झाड
वाढले अगदी माड ।
दुरवरचा तो पहाड
वाटे भलताच जाड ।
रात्री झोपेत गाढ
होइ तेव्हा नजरेआड ।
जोर पावसाला थाड थाड
उध्वस्त सारे बिर्हाड ।
फिरे आकाशी गिधाड
झाले सारेच उजाड ।
Sanjay R.

Thursday, September 29, 2016

" गुलाब पाकळी "

एक नाजुक गोंडस
हसरी कळी ।
गालावर तीच्या
गोड खळी ।
सुंदर डोळ्यात
कोर काजळी ।
गुलाबी ओठांना
किनार आगळी ।
वेडावते मज
छवी ही वेगळी ।
हवी हवी वाटे
गुलाब पाकळी ।
Sanjay R.

Sunday, September 25, 2016

" उंच उंच लाटा "

निघाल्या पाण्याच्या
उंच उंच लाटा ।
पायाशी सरकतात
वाळुच्या काठा ।
फेसाळलेले पाणी
परतीच्या वाटा ।
ह्रुदयातला हुंदका
येउन थांबे ओठा ।
अंतरी विचारांची गर्दी
मनी दुखा:चा साठा ।
भरती ओहटी चाले अशी
आनंदाच्या जिवन छटा ।
Sanjay R.