Wednesday, September 7, 2016

" अश्रु संपायचे आहेत "

आलो असा मी जन्माला
जिवन हे माझेच आहे ।
राबतो मी रोज मरतो
कष्ट उपसत जगायचे आहे ।
जग मोठे अलौकीक हे
रंग सारेच बघायचे आहे ।
माणुस माणसाचा काळ इथे
लाकडं चितेची रचायची आहेत ।
स्वार्थी कुणी परमार्थी इथे
अर्थी रोजच उचलायच्या आहेत ।
मरत मरत जगायचे
अश्रु अजुन संपायचे आहेत ।
Sanjay R.

Tuesday, September 6, 2016

" मनातल्या फुला "

माझ्या मनातल्या फुला
सांग मी किती वर्णु तुला ।
वाहतो ओसंडुन आनंद
घेते मन उत्साहाचा झुला ।
श्वास मावेना ह्रुदयात
झोत हवेचा आसमंतात खुला ।
खेळते मन कधी आकाशी
खेळु धरेशी लपाछपी चला ।
Sanjay R.

Sunday, September 4, 2016

" काळा अंधार "

दिवसाच्या उजेडात कसा
झाला काळा कुट्ट अंधार ।
तुटली सारी स्वप्न आता
सरला डोळ्यातला पाझार ।
झाले जड जगणे आता
कसा झेलु खांद्यावरी भार ।
सावली ही  गेली सोडुन
तुटली संगे बांधलेली तार ।
गेला सुटुन कीनारा आता
वाटे कठीन हा जिवन संसार ।
Sanjay R.



Wednesday, August 31, 2016

" अनोखी सृष्टी "

केली देवानं पहा
कशाची ही वृष्टी ।
अनोख्या रंगांची
बनवली सृष्टी ।

पाने फुले पशु पक्षांच्या
चाले  गुज गोष्टी ।
माणुस मात्र दिसतो
दुखीः आणी कष्टी ।
Sanjay R.

जब याद तुम्हारी आती है
तुम याद बहोत आते हो ।
दिलेमे यादे बहेत होती है
पर याद हमे तुमही आते हो ।
Sanjay R.

Saturday, August 27, 2016

" हरवुन गेलो "

लांब काळ्या केसातला मोगरा
घेउन गंध मी धुंद झालो ।

पाहुन तुझ्या डोळ्यात मी
डोळ्यात हरवुन गेलो ।

गोड लाजरे बघुन हास्य
सर्वस्व मी भुलुन गेलो ।

हलकेच तुज स्पर्श होता
बघ कसा शहारुन गेलो ।

अंगावर फिरले मोरपीस जणु
मनोमनी बहरुन गेलो ।

तुजवीण मज सुचेना काही
तुझ्यातच मी डुबुन गेलो ।

सांग काय वर्णु रुप तुझे
तुझाच मी होउन गेलो ।
Sanjay R.