Thursday, August 4, 2016

" वादे इरादे "

हो ना हो हम भी
करते याद तुम्हे भी ।
कुछ वादे कुछ इरादे
नजाने कैसे और भी ।
बाते दिलकी दिलमे
और सोचते हम भी ।
Sanjay R.

" नको इशारा "

आठव ते दिवस
ते उन तो वारा ।
मस्तीची सायंकाळ
आणी
पावसाच्या धारा ।
मनातला आनंद
संगे उत्साह सारा ।
आकाशी लुकलुकतो
चंद्र आणी तारा ।
दिवस श्रावणातला
मनी फुलतो पिसारा ।
तु आणी मी
नको इशारा ।
Sanjay R.

Sunday, July 31, 2016

" आला श्रावण आला "

सजणे ठसली ग
तु माझ्या मनात ।
हरवु दे मजला
तुझ्याच प्रेमात ।
घे साठउन मज
खोल  डोळ्यात ।
गुंफु दे आज
ओठ ओठात ।
वाढु दे स्पंदन तु
ये बाहुपाशात ।
घे भरभरुन तु
सुख रोमरोमात ।
Sanjay R.

Saturday, July 30, 2016

" वाढदिवस माझा "

वाढदिवसाची झाली
पुर्ण आज हौस ।
शुभेच्छांचा पडला
कीती मोठा पाउस ।

बघुन प्रेम मित्रांचे
भरुन आले मन ।
वेचला मी आनंदाचा
प्रत्येक तो क्षण ।

जिवनार्थ आज
मजला कळला ।
एक एक धागा
मित्रांनीच जुळला ।
Sanjay R.

Friday, July 29, 2016

" ध्यास "

लागला मज काळ्या
नभांचाच ध्यास ।
भरुन घेतो ह्रुदयात
ओल्या मातीचा श्वास ।
Sanjay R.