Saturday, July 16, 2016

" चारोळी मनाची "

सोबत कुणाची
कीती गुणाची ।
गोष्ट मनाची
नाही जनाची ।
खुशी कणाची
सुखी जिवनाची ।
Sanjay R.

न होगी ओठोकी मजबुरी
न होगी उनमे दुरी
ना कहानी यह अधुरी
बात दिलकी दिलमे पुरी

वाट जरी असेल काटेरी
शालु गुलाबाचा भरजरी
उत्साह भरला मनात
खिळली नजर तुजवरी ।
Sanjay R.

गुंतले मन तुझ्यात
वसली तु ह्रुदयात ।
वाटतं खुप भिजावं
चल जाउ पावसात ।
Sanjay R.

Friday, July 15, 2016

" नेम "

जमलच नाही कधी मला
करायला प्रेम ।
मनाचाही नव्हता माझ्या
काहीच नेम ।
Sanjay R.

" पंढरीची वारी "

पोहोचली वारी
विठ्ठलाच्या द्वारी ।
दुमदुमली पंढरी
विठ्ठलमय सारी ।
पाडुरंगाचा जयघोश
फुलल्या दिशा चारी ।
पांडुरंग हरी ।
पाडुरंग हरी ।
विठ्ठल विठ्ठल
जय हरी ।
Sanjay R.


Sunday, July 10, 2016

" सच्ची बात "

जो सच्ची बात है ।
वो अच्छी बात है ।
बात अगर हो झुटी
भरोसा तुटा और
जबान फुटी ।
इज्जत आबरु
सब लुटी ।
Sanjay R.

कुणी सहज विचारावं
प्रेम म्हणजे काय ।
आई आणी
तीच्या मुलातल
भावा बहीणीतल
बाप लेकीतलं
दोन मित्रातलं
पती पत्नीतलं
कुठल्याही नात्यातलं
बाधुन ठेवणारं
बंधन प्रेमाचच असावं
ही सारीच नाती
प्रेमानं बांधलेली
प्रेमातुन काय सुटेल ।
दोन ह्रुदय ही
प्रेमा वीणा
का धडधडतील ।
प्रेमच माणसाला
प्रेमानं जगवतील ।
प्रेमा शिवाय
नाही काही ।

Saturday, July 9, 2016

" डोळ्यात पाणी "

माणसाचा अविचार
पाणी आणतो डोळ्यात ।
थेंबा थेंबाचा हिशोब
हुंदका दाटतो गळ्यात ।
फुल होण्या आधीच
नसतो गंध कळ्यात ।
Sanjay R.