सरली आता माणुसकी
उरला नाही माणुस ।
खुप छळतो मनाला
नको जास्त ताणुस ।
दुख: आहे सगळीकडे
नको डोळ्यात पाणी आणुस ।
प्रेम द्या प्रेम घ्या
दुर नको पळुस ।
Sanjay R.
Saturday, July 9, 2016
" माणुसकी "
Friday, July 8, 2016
" ह्रुदयाचा ठाव "
कळले मला केव्हाच
तुझ्या डोळ्यातले भाव
मनातही माझ्या बघ
तुझच आहे नाव ।
नकोच छळु मज आता
सोड सारे डाव ।
नाही कळला कधीच कुणा
माझ्या ह्रुदयाचा ठाव ।
कारण आधीच वसवला मी
अंतरात तुझा माझा गाव ।
Sanjay R.
" झमाझम पाउस "
आज सक्काळ पासुन मस्त
झमाझम पाउस सुरु आहे ।
आज कुठही न जाता छान
खिडकीतुन पाउस बघायची
मजाच काही और आहे ।
वाटलं तर गरमागरम चहा मस्त
सोबत कांदी भजी ललचावत आहे ।
विचार आला थोडा मनात
जाउन थोडं घ्यावं का भिजुन
आणी छोटसं काम निघताच
मनोरथ पुर्ण करुन आलो आहे ।
मजा मजा म्हणतात ना ती हीच असावी
कुणास ठाउक पावसाची सर
मनात खोलवर छान ठसावी ।
Sanjay R.
Thursday, July 7, 2016
" रंगोळी "
रंग पांढरा शांतीचे प्रतीक
लाल रंगात प्रेमच अधीक ।
हिरवा पिवळा निळा काळा
सार्याच रंगात मनाचे गुपीत ।
नवरंगांची ही दुनीयाच न्यारी
इंद्र धनुतही उधळते रंगोळी ।
प्रसन्न चीत्त आनंदी मुद्रा ।
खुलुन दिसते गालावर खळी ।
Sanjay R.