Monday, July 4, 2016

" दिसतय जग "

झाडाआडुन डोकावतो
पावसाचा एक ढग ।
पडायचे पाउस होउन
आहे त्याच्यात रग ।
सरली बरं आता
लाल सुर्याची धग ।
नजरेचा एक कटाक्ष
तिरकी तु डोळ्यात बघ ।
डोळ्यात मज तुझ्या
सारं दिसतय जग ।
Sanjay R.

Sunday, July 3, 2016

" सुख आणी दुख: "

आनंद आणी दुखा:चे
मिलन आहे जिवन ।

बघता क्षितीजा पुढे
अनंत आहे गगन ।
Sanjay R.

विचारांना कुठे
असतो विषय ।

उठतील तरंग जिकडे
धावेल मन तिकडे ।

कधी फुलेल मनमोहक
कधी अंतरात दुखावेल ।
Sanjay R.

Saturday, July 2, 2016

" रिमझीम रिमझीम "

रिमझीम रिमझीम
सरींची बरसात ।
झाली आता
कामाला सुरवात ।
भिजायचा आनंद
सुखावतो मनात ।
सरली चिंता
उत्साह ढगात ।
फुलली धरा
हिरवळ अंगणात ।
Sanjay R.

Tuesday, June 28, 2016

" भावना अंतरीची "

अजाण या माझ्या मना
जाण भावना अंतरीची ।

एकच विचार मनी परततो
नाही उसंत का क्षणाची ।

सदा पुढ्यात तुझीच छवी
ही ओढ तुझ्या आठवांची ।

क्षण नी क्षण मंतरलेला
उणीव तुझ्या अस्तीत्वाची ।
Sanjay R.

" कळी मनातली "

बघुन फोटोत का तुजला
सुचतात मज चार ओळी ।

चेहर्यावरील बघुन आनंद
खुलते मनातली कळी ।

शांत चीत्त मनोहारी रुप
गालावरची खुलते खळी ।

शोधते नजर जेव्हा तुजला
मनात उठते भावना वेगळी ।
Sanjay R.