Saturday, June 11, 2016

#sixwordstory

सहा शब्दांची ओळ
त्याला अलंकारांची खोळ ।

मोडक्या संसाराची एक कहाणी
रोजचीच रडगाणी ।

कीती करणार चुका
घेउ दे मुका  ।

रोज करायचं शिवण
यालाच म्हणतात जिवन ।

काय असणार नवीन
प्रेमात मीच प्रवीण ।

Sanjay R.

#sixwordstory

" गजरा "

ल्याली बघ तु
सुंदर गजरा ।
सुगंधानं फुलला
डोइवर मोगरा ।
चेहरा तुझा गं
गोड हासरा ।
डोळ्यात दिसतो
भाव लाजरा ।
Sanjay R.

Friday, June 10, 2016

" लागली मनात रुख रुख "

लागली मनात
रुख रुख ।
दुःखात शोधतो
सुख ।
अंतरात लागली
भुक ।
वेड्या मनाची
काय चुक ।
चमचमतो तारा
लुक लुक ।
थोडी आशा
अंधुक ।
अंतरात शब्द
झाले मुक ।
जगतो मी
विन्मुख ।

" नको हा विरह "

नको वाटतो मज
शब्दच हा विरह ।
तुजवीण सांग मी
मनाचा होतो दाह ।

असता तुझी साथ
नसते कुठली पर वाह
तु आणी मी दोघांचा
होउ दे एक प्रवाह ।
Sanjay R.

" अमृत प्याला "

तुझ्या सहा शब्दांना
माझा एकच शब्द पुरे ।
जन्म म्हण वा म्रुत्यु
कुणास हवेत हार तुरे ।

नको अडकउस शब्दात मज
शब्दांची जशी होते कवीता ।
डोळ्यात जरी स्वप्नांची आरास
तरी जन्म जातो रीता रीता ।

शब्द शब्दांना करुन गोळा
भाषा संग्रह रुप ल्याला ।
विचारांच्या त्या दशदीशा
जिवन झाले अमृत प्याला ।
Sanjay R.