Friday, June 3, 2016

' असेल जरी कमी "

नको आम्हा  दया
फक्त हवी माया ।
आभार देवाचे
दिली आम्हा काया ।
असेल जरी कमी
जन्म नाही वाया ।
इमानानं जगु
धरणार नाही पाया ।
कष्टानं मिळवु सुख
सोबत आनंदाची छाया ।
चार पावलं चालु सोबत
सहभागी तुमचा व्हाया ।
Sanjay R.

" राज्य बळीचे "

नकोच ती कल्पना
मनात पुन्हा पुन्हा ।
कष्ट करुन जगतो
काय त्याचा गुन्हा ।

उपाशी त्याची पोरं
सोबतीला गुरं ।
चिंता इतरांची वाही
कुणास ठावं काय बरं ।

फाटकं तुटकं घालतो
आणी कापुस पिकवतो ।
सारंच जनास देतो
स्वतःला काय घेतो ।

नाही येणार कधीच
राज्य बळीचे ।
बरेच आहेत इथे हो
नारद कळीचे ।
Sanjay R.

Tuesday, May 31, 2016

" स्वप्नांची दुनीया "

स्वप्न दुनियेत
अजबच घडले ।
रोज स्वप्नांचे
व्यसनच जडले ।
कधी मधी होते
आकाशाची सैर ।
आणी कधी कधी
तर प्रृथ्वीचा फेर ।
कधी उठवायला
येते अप्सरा ।
कधी अवतरतो
राक्षस भराभरा ।
कधी हळुच
गालात हसतो ।
नाहीतर डोळ्यात
आसु दिसतो ।
स्वप्नांची ती
दुनीया न्यारी ।
मन हलके
देह भारी ।
Sanjay R.

" वणवा "

गुण गुण गुणीत
गुण गुण गुणीत
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
नाही पाणी तळ्यात
सुकली आसवं उन्हात ।
पटला वणवा वनात
सरले सारे क्षणात ।
Sanjay R.

Friday, May 27, 2016

" काळोख "

अवतरला चंद्र नभात
चमचमती चांदण्या अंगणात ।
मधेच सळसळ पानांची
का धडधडते ह्रुदय काळोखात ।
Sanjay R.