Friday, May 27, 2016

" सागर किनारा "

अथांग सागर
आणी त्याच्या लाटा ।
धाव किनारी
नाहीत तिथे वाटा ।
शोधतात अंत
परत जाता जाता ।
सुटतात खुणा
नाही कुणी विधाता ।
खेळ भरती ओहटीचा
चाले समुद्री साता ।
Sanjay R.

Thursday, May 26, 2016

" पीहु पीहु "

बात दिलकी
मै तुझसे कहु ।
क्या मै तेरे
दिलमे रहु ।
कह दे मुझको
क्या तुझे चाहु ।
माॅ को उसकी
दे दु बहु ।
होगी क्या तु
मेरी पीहु ।
Sanjay R.

Wednesday, May 25, 2016

" बालपण "

खुप आठवतं
मज ते बालपण
नाचायचं बागडायचं
करुन काहीपण ।
कधी मस्ती धींगा
कधी चालायचा दंगा ।
भांडण मारामारी
मुद्दाम घ्यायचा पंगा ।
नव्हती कशाची चिंता
उगाच करायचा गुंता ।
झेलायचा आईचा मार
डोळे पुसुन व्हायचे पसार ।
Sanjay R.


" वादळ नभांचे "

होउन वार्यावर स्वार
उडविण्या म्रुगाचा बहार
देण्या आनंदाचे तुषार
रुजविण्या नवीन अंकुर
निघाले लांबुन फार
वादळ नभांचे काळेशार ।
Sanjay R.

Sunday, May 22, 2016

" जिवन तंत्र "

हाडाचे वैरीही
कधी होतात मीत्र ।
अजब आहे या
जिवनाचे तंत्र ।

जन्मापासुन झेलायचे
एक एक सत्र ।
रोज एक अभंग
रोज एक मंत्र ।

आनंद असो वा दुख:
  विचारात चरीत्र ।
चेहर्यावर थोडे हास्य
अंतरात गोंधळ मात्र ।
Sanjay R.