Sunday, May 22, 2016

" जिवन तंत्र "

हाडाचे वैरीही
कधी होतात मीत्र ।
अजब आहे या
जिवनाचे तंत्र ।

जन्मापासुन झेलायचे
एक एक सत्र ।
रोज एक अभंग
रोज एक मंत्र ।

आनंद असो वा दुख:
  विचारात चरीत्र ।
चेहर्यावर थोडे हास्य
अंतरात गोंधळ मात्र ।
Sanjay R.

Saturday, May 21, 2016

" बोलव ढगांना "

संपव रे देवा
उन्हाच्या झळा ।
राग सुर्याचा
कोरडा गळा ।
निघताच बाहेर
नुसते पळा पळा ।
दुष्काळ पाण्याचा
जिवाचा कळवळा ।
सुकली झाडं
उडतो पाचोळा ।
बोलव ढगांना
सुरु कर पावसाळा ।
Sanjay R.

लिहीतो काही बाही
असाच मी
मनानही आहे
तसाच मी ।
गडबड गोंधळ
वेंधळा मी
सदा असतो आपल्यात
तसाच मी ।
नाही विससरत तुला
तरी माझाच मी ।
Sanjay R.

Thursday, May 19, 2016

" नवी सकाळ "

दिवसा मागुन जाता दिवस
बदलतं सारच मागचं ।
नाविन्याचा होतो जन्म
फुलुन जाते पुढचं ।
होताच वेळ शेवटाची
पुढ्यात यतो काळ ।
सुर्यासंगे होते परत
पुन्हा नवी सकाळ।
Sanjay R.

Sunday, May 15, 2016

" छेडता एक तार "

छेडता हलकेच
ह्रुदयाची एक तार ।
घेइ आलाप
सुरांची बोले सतार ।
बहरला बघा
मनी नाद बहार ।
उठले हळुच अंतरी
सुमधुर  हुंकार ।
म्रुदंगाच्या थापेला
पैजणीची किनार ।
ढोलकीच्या नादाला
पावलांचा थरार ।
तुकोबाच्या अभंगाला
टाळ चापड्यांचा मार ।
संगीताची गोडी
थबकती कर्ण चार ।
मनात उठता लय
डोले अंगी विचार ।
Sanjay R.

" आलम "

दिलमे जब हो इश्क
हो मोहब्बत का आलम ।
ना हो आखोमे अश्क
बेवफाइ का सितम ।
हर दम एक हो गम
पर लगे दर्द कुछ कम ।
Sanjay R.