Sunday, May 15, 2016

" छेडता एक तार "

छेडता हलकेच
ह्रुदयाची एक तार ।
घेइ आलाप
सुरांची बोले सतार ।
बहरला बघा
मनी नाद बहार ।
उठले हळुच अंतरी
सुमधुर  हुंकार ।
म्रुदंगाच्या थापेला
पैजणीची किनार ।
ढोलकीच्या नादाला
पावलांचा थरार ।
तुकोबाच्या अभंगाला
टाळ चापड्यांचा मार ।
संगीताची गोडी
थबकती कर्ण चार ।
मनात उठता लय
डोले अंगी विचार ।
Sanjay R.

" आलम "

दिलमे जब हो इश्क
हो मोहब्बत का आलम ।
ना हो आखोमे अश्क
बेवफाइ का सितम ।
हर दम एक हो गम
पर लगे दर्द कुछ कम ।
Sanjay R.


Friday, May 13, 2016

" काय तुझी अदा "

बघीतलं मी तुला
काय तुझ्या अदा ।
मनातलं सांगतो
झालो मी फीदा ।
साठवणीत तु
आठवतो सदा ।
Sanjay R.

कुणी काही बोलत नाही
कुणी काही चालत नाही
थंड गार पडला ग्रुप
अरे कुणीतरी वाजवा नगारे
उठा आता सारे पेटलाय धुप
Sanjay R.

Wednesday, May 11, 2016

" तकदीर "

निकलते जब साथ साथ
तकदीर लेकर  हम ।
देखते लोग तस्वीर जादा
और दिलको कम ।
जिंदगी हमारी है
भरा सागर उतने गम ।
किसीको न चिंता कोइ
बस निकलता हमारा दम ।
युही कटेगी जिंदगी
सुख हो या  दुख सोचो कम ।
आवो हसते हसते चले
रास्तोमे फुल जादा काटे नम ।
Sanjay R.

Sunday, May 8, 2016

" माय मायेचा झरा "

माय माझी अशी
जसा मायेचा झरा ।
उलगडता बालपण
वाटा आईचा खरा ।

उठलो पडलो जरी
थोडाच मी रडलो ।
जपले मज आईने
सावलीत तीच्या घडलो ।

लोण्याहुन मउ ती
कधी कठोरही झाली ।
जिवनाचे देउन पाठ
मज चढविले महाली ।

आई रुणी गं मी तुझा
नाही होणार फेड जन्मात ।
होइन आनंदाची काठी मी
नको चिंता म्हातारपणात ।
Sanjay R.