कभी उन्हे भुल जाना
कभी हमे याद करना
जिंदगी का ये तराना
दिलका यही फसाना
कोइ गायेगा दिवाना
यही हसने का बहाना
सफर जिंदगी का सुहाना ।
Sanjay R.
Monday, April 4, 2016
" सफर सुहाना "
Tuesday, March 29, 2016
किलबील
कुणी कौणाला
त्रास देउ नये ।
विनाकारण कुणी
फास घेउ नये ।
दुसर्याच्या वस्तुचा
ध्यास धरु नये ।
आपणच आपला
नाश करु नये ।
Sanjay R.
किलबील किलबील पाखरांची
घाइ आकाशात सुर्याची ।
लगबग परतीची माणसांची
चाहुल लागली अंधाराची ।
Sanjay R.
Saturday, March 26, 2016
" करार "
कालच भेट झाली हो
तशी माझी त्या यमाशी ।
म्हणाला खुप कामं आहेत
गठबंधन झाले ISI शी ।
छोट्या मोठ्या विचारु नका
बर्याच आहेत एजंशी ।
वेळेआधीच डिलीव्हरी मागतात
गाठ आहे आतंक वादाशी ।
श्वास घ्यायला फुरसत नाही
बांधले आहोत आम्ही कराराशी ।
Sanjay R.
चला खेळु या रंग ।
येणार कोण संग ।
Happy holi....
बघु या आता
कसा रंग लावतील ते ।
टाळुन ओले रंग
पाणी वाचवतील ते ।।
Sanjay R.
Wednesday, March 23, 2016
" आली होळी आली "
आली होळी
होळी आली ।
झाडांची तर
कत्तल झाली ।
गोड गुलाबी
रंग ल्याली ।
माणसांनी ही
नशा प्याली ।
कुठे आनंद
हर्षोल्लास गाली ।
कुठे रक्तात
पेटल्या मशाली ।
Sanjay R.
Tuesday, March 22, 2016
" थेंब थेंब वाचवु सारे "
रोज सकाळी ऐकु येतो
कोलाहल कानी ।
उठा उठा चला जाउ
भरायचे आहे पाणी ।
भांडे घेउन निघतात सारे
रोजचीच ही रडगाणी ।
थेंब थेंब आटला आता
सांगायची कुणा कहाणी ।
उमगला जिवनार्थ आता
पाण्याविना बेकार जिनगाणी ।
एक एक थेंब वाचवु सारे
गाउ मिळुन पावसाची गाणी ।
Sanjay R.