भरला मुर्खांचा बाजार
त्यासी पागलांचा शेजार ।
घालुन कुणी विजार
का चुकवीतो नजर ।
नाही थांबत बझर
मोठ्या मोठ्याने सारे
करीतसे उभा गजर ।
नाव घेता क्षणी ते
होती भांडण्या हजर ।
Sanjay R.
Monday, March 21, 2016
" बाजार "
" आचार विचार "
" आचार विचार "
तुझा तो आचार ।
माझा तो विचार ।।
चला करु प्रचार ।
अंगात होइल संचार ।।
सुचतील मग सुविचार ।
जाइल दुर गरवाचार ।।
नसेल कुठे अनाचार ।
उपटुन काढु दुराचार ।।
सगळ्यांचा एकच विचार ।
चला करु मग प्रचार ।।
Sanjay R.
" दिसेल ते बघायचं "
दिसेल ते बघायचं
असेल ते भोगायचं ।
आहे त्यातच
आनंदानं जगायचं ।
जिवनाचं सत्य
त्यातच शोधायचं ।
Sanjay R.
हसायचं म्हटलयावर
कसं ते जमवायचं
कोणी मजला सांगेल का ।
वातावरण मात्र मस्त हवं
नको आनंदात विरजण
खळखळुन हसायला जमेल का ।
मधे आलं होतं डोक्यात माझ्या
हास्य क्लबात जावं तिकडं
आनंद तिथं हवा तसा मिळेल का ।
घरीच करु या प्रयत्न थोडा
हसु या सारे मिळुन मिसळुन
थोडं थोडं घुसळुन घुसळुन
घर आनंदानं छान फुलेल ना ।
चला हसु या सारे मिळुन
आनंदानं थोडं खिदळुन
चेहर्यावर खुशी छान दिसेल ना ।
Sanjay R.
" घाव "
झेलायचे कीती घाव सांग मना
दुख: झाले असह्य सांगु मी कुना
नकोत दिवस असे सांगतो पुन्हा
बरा होतो मी माझा तसाच जुना
टाकु दे मज मिटउन सार्या खाना खुना ।
Sanjay R.
Saturday, March 12, 2016
" विसावा "
कंटाळा येतो ना
हलो हलो करायचा ।
मिळेल केव्हा वेळ
शांतपणे बसायचा ।
चला जाउ दुर कुठे
शीण घालउ मनाचा ।
होउन हलकं थोडं
विसावा घेउ क्षणाचा ।
Sanjay R.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जब जब रुठ जाती हो तुम
गुलाब भी पड जाते है कम ।
देखकर मुस्कुराहट तुम्हारी
भुल जाता हु मै अपने गम ।
साथ दुखो का सागर मगर
भुल जाता तब मै दर्दे वहम ।
याद आती जब मोहब्बत हमे
हो जाती तब आखे नम ।
Sanjay R.