अथांग सागर त्याच्या
उफाळणार्या लाटा ।
लोटला जन सागर
त्यांचा बेफाम वाटा
नाही कुठला ताल सुर
सगळीकडे नुस्ता कचाटा ।
Sanjay R.
Friday, March 11, 2016
अथांग सागर
Wednesday, March 9, 2016
आसवांच्या धारा
उन वादळ
पाउस वारा
मधेच लखलखतात
विजेच्या तारा ।
बोरा सारख्या मग
पडल्या गारा ।
पिकं शेतातली
आडवा पसारा ।
बळीराजा चिंतेत
नाही सहारा ।
जळते चिता
आसवांच्या धारा ।
Sanjay R.
Monday, March 7, 2016
Sunday, March 6, 2016
" नाही कुनी "
नाही माझ्या ध्यानी मनी
दिली साद का मला कुनी ।
अंगणात फुलला गुलाब मोगरा
सुगंध त्याचा आठवण जुनी ।
एकांत आता सखा सोबती
नाही आधार ती जागा सुनी ।
वाट आयुष्याची सरता सरेना
सोबतीला माझ्या नाही कुनी ।
Sanjay R.
Friday, March 4, 2016
" उरली राख "
गेल्या जळुन भावना
ह्रुदय बघ होरपळले ।
उरली राख जिवना
आयुष्य पुरे कोसळले ।
फुलेल का कधी कमळ
चिखलात अंग रुतले ।
नाही उरल्या आशा
दिवस असेच सरले ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)