Monday, March 7, 2016

घे पुसुन अश्रु आता

घे पुसुन अश्रु आता
नाही येणार कुणीच पुढे ।
हुंदकाही टाक गिळुन
बंद कानांचे सारेच घडे ।
Sanjay R.

Sunday, March 6, 2016

" नाही कुनी "

नाही माझ्या ध्यानी मनी
दिली साद का मला कुनी ।

अंगणात फुलला गुलाब मोगरा
सुगंध त्याचा आठवण जुनी  ।

एकांत आता सखा सोबती
नाही आधार ती जागा सुनी ।

वाट आयुष्याची सरता सरेना
सोबतीला माझ्या नाही कुनी ।
Sanjay R.

Friday, March 4, 2016

" उरली राख "

गेल्या जळुन भावना
ह्रुदय बघ होरपळले ।
उरली राख जिवना
आयुष्य पुरे कोसळले ।
फुलेल का कधी कमळ
चिखलात अंग रुतले ।
नाही उरल्या आशा
दिवस असेच सरले ।
Sanjay R.

Saturday, February 27, 2016

" महीमा मराठीचा "

काय वर्णावा
महीमा मराठीचा ।
जसा कापसा वीना
तोरा पर्हाटीचा ।
मिरवतोय झंडा
त्याचा दांडा तुराटीचा ।
गावांनी जोपासला
व्रुक्ष भरभराटीचा ।
मात्र इंग्रजीनं घेतला
बळी मर् हाटीचा ।
Sanjay R.



Friday, February 26, 2016

" मनात भिनलं वारं "

नको वाटतं सारं
घ्यावी बंद करुन
मनाची दारं ।
दुर एकांतात
जाउन बसावं
सोडुन सारं ।
कुणास ठाव असं
का  डोक्यात भिनलय
हे असलं  वारं ।
चला फिरुन
येउ थोडं
बघु आकाशात
चमचमणारं तारं ।
Sanjay R.