गेल्या जळुन भावना
ह्रुदय बघ होरपळले ।
उरली राख जिवना
आयुष्य पुरे कोसळले ।
फुलेल का कधी कमळ
चिखलात अंग रुतले ।
नाही उरल्या आशा
दिवस असेच सरले ।
Sanjay R.
Friday, March 4, 2016
" उरली राख "
Saturday, February 27, 2016
" महीमा मराठीचा "
काय वर्णावा
महीमा मराठीचा ।
जसा कापसा वीना
तोरा पर्हाटीचा ।
मिरवतोय झंडा
त्याचा दांडा तुराटीचा ।
गावांनी जोपासला
व्रुक्ष भरभराटीचा ।
मात्र इंग्रजीनं घेतला
बळी मर् हाटीचा ।
Sanjay R.
Friday, February 26, 2016
" मनात भिनलं वारं "
नको वाटतं सारं
घ्यावी बंद करुन
मनाची दारं ।
दुर एकांतात
जाउन बसावं
सोडुन सारं ।
कुणास ठाव असं
का डोक्यात भिनलय
हे असलं वारं ।
चला फिरुन
येउ थोडं
बघु आकाशात
चमचमणारं तारं ।
Sanjay R.
Tuesday, February 23, 2016
" कवीचे हाल "
कवितेसंग कवीचेबी
हाल लयच बेकार ।
शब्दासंग लढतेत बिचारे
तरी सोसतेत नकार ।
बराबर लावतेत थे
शब्दायले उकार ।
जमवतात कवीतेचे
नानावीधी परकार ।
तुमीच सांगा त्यायले
देइन कोन आधार ।
तरी त्यायची गती
नाही करत चमत्कार ।
Sanjay R.
Sunday, February 21, 2016
" तेरी यह अदा "
तेरी हर अदा से मै
इकरार करता हु ।
तु साथ हो मेरे
प्यार तुम्हीसे करता हु ।
देख तेरी आखे मै
खुदको भुल जाता हु ।
हर वक्त ढुंढती निगाहे
सपनोमे खो जाता हु ।
आहट जब तुम्हारी
महसुस जब मै करता हु ।
तब मै करीब अपने
बस तुमको ही पाता हु ।
Sanjay R.