Tuesday, January 5, 2016

"मी जंगलचा राजा "

जंगलचा मी राजा
भिती मज कुणाची ।
शिकार करुन थकलो
उसंत नाही क्षणाची ।
आराम करु द्या थोडा
मग सांगेन पाळी कुणाची ।
Sanjay R.

Tuesday, December 29, 2015

" गोड गुलाबी वारा "

थंड थंड गार गोड गुलाबी वारा
गारठला आसमंत थरथरली धरा ।
उब हवी तनाला सुचेना मनाला
थरथरले अंग चहु ओर कळा ।
शोधतो आग गरमीची साथ
पेटली शेकोटी उंच तिच्या जाळा ।
Sanjay R.

Saturday, December 26, 2015

गारव्याची एक लहर

हलकेच उठुन आली
गारव्याची एक लहर ।
थरथरले अंग माझे
मनात विचारांचा बहर ।
उठले वादळ आकाशी
चहुओर झाला कहर ।
कुणा मिळे माया उबदार
कुणा थंड वार्याचे प्रहार ।
Sanjay R.

Friday, December 25, 2015

माझा मीच बरा

माझा मीच बरा
कोण इथं खरा ।
आटले पाणी आता
आटला निर्मळ झरा ।
नाही उरला माणुस
आजुबाजुला बघा जरा ।
नुसते डोंब आगीचे
चला जाउ या घरा ।
Sanjay R.


Sunday, December 20, 2015

फक्त तु

तुझ्या हसण्याचा
गोड मधुर स्वाद ।
तुझ्या असण्यचा
मजुळ असा नाद ।
तुझ्या रुसण्याचा
नसतो मग संवाद ।
नेत्र मग शोधतात तुला
मिटतात सारे विवाद
Sanjay R.