Sunday, July 26, 2015

" मनातले वादळ "

सख्या चिंब भिजले मी
पावसाचा खेळ सारा ।
अशांत कीती झाले बघना
मनात उठले वादळ वारा ।

खुणावतो स्पर्श मजला
वेडा पिसा देह सारा ।
शोधते मी नजरेत आता
काळोखात चमकता तारा ।

अंतरात या पेटली धुंद
हवी मजला शितल धारा ।
श्वासांचे तु मिलन होउ दे
मनः शांतीचा भावच न्यारा ।
Sanjay R.

Saturday, July 25, 2015

प्रित तुझी


प्रित तुझी माझी
का कळेणा कुणा ।
साक्ष चंद्र सुर्याची
पुरे माझ्या मणा ।

बहरु दे  मोगरा
सुगंधा विणा ।
निशीगंध फुलेल
प्रितीच्या खुणा ।

जागली रात्र मी
कशी तुज विणा ।
पहाटेचा सुर्य
प्रकाशा विण ।

नको सोडु मज
क्षणभर बिणा ।
प्रित तुझी माझी
कळली मणा ।
Sanjay R.

वारी वारी

घेउन मिठीत तुला
वाटे प्रेम गीत गावे ।
हरपुन सारी शुद्ध
ओठांनीच ओठ प्यावे ।
Sanjay R.

खेळ हरीचा आणी
शब्द पसारा।
अभंग तुकोबाचे 
भक्ती रस सारा ।
Sanjay R.

तुझ्या माझ्या प्रेमाची
आगळीच एक माया ।
नको झुरु  मना आता
करु  या एक काया ।
Sanjay R.

खुलले आज
माझे भाग्य ।
दरशन झाले
काशी प्रयाग ।
Sanjay R.

शब्दांचा बघा
रंगच न्यारा ।
कधी वादळ वारा तर
कधी मयुर पिसारा  ।
Sanjay R.

" पंढरी "

दिन रात तुम याद आती हो ।
सपनेमो भी साथ आती हो ।
दिल मेरा ना तोडना कभी ।
इसी दिलमे तुम मुस्कुराती हो ।
Sanjay R.

पंढरी .......
गाव तुझा विठोबाचा
सोबती विठुराया
भाग्य किती तुझे
लाभते माया ।
Sanjay R.

शब्दांचा बघा
रंगच न्यारा ।
कधी वादळ वारा तर
कधी मयुर पिसारा ।
Sanjay R.

" सुगंधीत दश दिशा "

माणसाचं जिवन ही अशीच
एक कविता आहे ।
कधी  शब्दांनीच बहरणारी
तर कधी घायाळ होणारी आहे ।
Sanjay R .

मनात आशा
नाही निराशा ।
फुलतो गुलाब
सुगंधी दश दीशा ।

निघता शोधाया
एक शब्द ।
अवतरते कविता
झळकते प्रारब्ध ।

तुझ्या माझ्या प्रितीचा
असा एक धागा ।
दुर असतांना आपण
नुसता मनात त्रागा ।

असेल जर का
कवितेचा मोह ।
शोधायचे शब्द
उलथुन डोह ।
Sanjay R