Wednesday, July 22, 2015

" साथ हवी "

काट्यात फुलणारा गुलाब
काळोखात बहरणारा निशीगंध
चिखलात सजणारा कमळ
मनात दरवळणारा सुगंध
सार्यांना साथ हवी एकच
आनंदानं झुलणार्या त्या प्रितीची ।
Sanjay R.

" रिंगण "

मनान हळुच दुर बघायचं
शब्दांना थोडंच उलगडायचं ।
हळुवारपणानं थोडं जुळवायचं
आनंदाला बघ असच जपायचं ।
Sanjay R.

नकोच सांगु शब्दात ।
अनमोल तुझ्या भावना ।
मन नाही दगड ।
तुझी तुलाच सांत्वना ।
Sanjay R.

आयुष्य माणसाचं
आहे गोल रिंगण ।
मी ही त्यातलाच
नाही त्यासी अंगण ।
दुर त्याच्या हाती
जिवनाचा कणन कण ।
सुरुवात होते जिथुन
संपतो तिथेच क्षण ।
तरी मी चा तोरा
जगतो घेउनच जिवन ।
Sanjay R.

" रिंगण "

मनान हळुच दुर बघायचं
शब्दांना थोडंच उलगडायचं ।
हळुवारपणानं थोडं जुळवायचं
आनंदाला बघ असच जपायचं ।
Sanjay R.

नकोच सांगु शब्दात ।
अनमोल तुझ्या भावना ।
मन नाही दगड ।
तुझी तुलाच सांत्वना ।
Sanjay R.

आयुष्य माणसाचं
आहे गोल रिंगण ।
मी ही त्यातलाच
नाही त्यासी अंगण ।
दुर त्याच्या हाती
जिवनाचा कणन कण ।
सुरुवात होते जिथुन
संपतो तिथेच क्षण ।
तरी मी चा तोरा
जगतो घेउनच जिवन ।
Sanjay R.

Tuesday, July 21, 2015

" शुन्यच गवसलं "

माणसाचं आयुष्य
असतं  हे असच ।
फार मोठं गोल
आहे हे रिंगण ।
जिथनं सुरु होतं
तिथच ते संपतं ।
आयुष्यभर फिरा
शुन्यच गवसतं ।
Sanjay R.

" विठोबा माउली "

विठोबा माउली
दे मज तु सावली ।
देवा यायचे मज
तुझीया द्वारी ।
मनी निर्धार
पंढरीची वारी ।
ईंद्रायणी तीरी
जण लोट भारी ।
वाहते काळजी
माय रुकमाई ।
विटेवरुन माझा
पांडुरंग पाही ।
उत्साह जनात
भरभरुन वाही ।
गजर नामाचा
आनंद देई ।
मनी आता ध्यास
विठ्ठल रुकमाई ।
Sanjay R.